देवेंद्र, सर्वेश, अफानची महाराष्ट्राच्या संघात निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 01:09 AM2018-02-01T01:09:26+5:302018-02-01T01:09:42+5:30
स्कूल स्पोर्टस् प्रमोशन फाऊंडेशनतर्फे दिल्ली येथे होणाºया राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी देवेंद्र सोनवणे, सर्वेश इंदल मीना आणि शेख अफान यांची महाराष्ट्राच्या फुटबॉल संघात निवड झाली आहे. या खेळाडूंना त्यांना एसएसपीएफ संघटनेचे सचिव व प्रशिक्षक शेख अस्लम यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
औरंगाबाद : स्कूल स्पोर्टस् प्रमोशन फाऊंडेशनतर्फे दिल्ली येथे होणाºया राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी देवेंद्र सोनवणे, सर्वेश इंदल मीना आणि शेख अफान यांची महाराष्ट्राच्या फुटबॉल संघात निवड झाली आहे. या खेळाडूंना त्यांना एसएसपीएफ संघटनेचे सचिव व प्रशिक्षक शेख अस्लम यांचे मार्गदर्शन लाभत आहे. हे खेळाडू दररोज सायंकाळी ३ तास सराव करतात. या निवडीबद्दल त्यांचे शेख मोहम्मद, सय्यद अबू तल्हा, शेख मुबीन, अकीब शेख, शेख अल्ताफ यांनी अभिनंदन केले.