भाविकांनी घेतले कार्तिकस्वामींचे दर्शन
By | Published: December 2, 2020 04:06 AM2020-12-02T04:06:28+5:302020-12-02T04:06:28+5:30
सिडको एन-१ परिसरातील राधाकृष्ण मंदिरात कार्तिकस्वामींची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. येथे भाविकांनी सर्व नियम पाळत भगवंतांचे दर्शन घेतले. ...
सिडको एन-१ परिसरातील राधाकृष्ण मंदिरात कार्तिकस्वामींची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. येथे भाविकांनी सर्व नियम पाळत भगवंतांचे दर्शन घेतले. सायंकाळी भाविकांनी रांगा लावल्या होत्या; पण रात्री ८ वाजेनंतर भाविकांची गर्दी ओसरली होती. सर्वजण कार्तिकस्वामींना मोरपंख अर्पण करीत होते. अनेक जण नवीन नोटा भगवंताच्या पायाला लावून आपल्या पाकीटमध्ये ठेवत होते.