चुरशीच्या लढतीत धोंडेंची बाजी
By Admin | Published: October 25, 2014 11:25 PM2014-10-25T23:25:38+5:302014-10-25T23:49:36+5:30
राजेश खराडे ,बीड जिल्ह्यात मोदी लाट व स्व. गोपीनाथ मुंडे यांची भावनिक लाट ही बीड मतदार संघावर व आष्टी, पाटोदा, शिरुर या मतदार संघावर काही परिणाम होणार नसल्याचे बोलले जात होते.
राजेश खराडे ,बीड
जिल्ह्यात मोदी लाट व स्व. गोपीनाथ मुंडे यांची भावनिक लाट ही बीड मतदार संघावर व आष्टी, पाटोदा, शिरुर या मतदार संघावर काही परिणाम होणार नसल्याचे बोलले जात होते. त्यामुळे या दोन मतदार संंघावर आजी-माजी राष्ट्रवादी उमेदवारांची पकड असल्याने विजय निश्चित मानला जात होता. मात्र बीड मतदार संघात क्षीरसागर यांचा काठावर विजय तर आष्टी मतदार संघात धसांना काठावर पराजय स्वीकारावा लागला आहे.
मतमोजणी प्रक्रियेदिवशी सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले होते ते बीड व आष्टी मतदार संघातील निकालाकडे. बीडमधून रा.कॉ.जयदत्त क्षीरसागर व भाजपाचे विनायक मेटे या दोन प्रमुख उमेदरांतच खरी लढत झाली होती तर आष्टी मतदार संघात रा.कॉ. सुरेश धस व भाजपाचे भिमराव धोंडे यांच्या सरळ लढत झाली होती. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत रा.कॉ. ला सुरुंग लागला होता यातून बीड आणि आष्टी मतदार संघ निभावेल असे वाटत होते मात्र मोदींची लाट व जनतेचा रोष यातून आष्टी मतदार संघही रा.कॉ. च्या हातचा गेला आहे.
तरीही सुरेश धस पराभूतच
आष्टी,पाटोदा, शिरूर मतदार संघातील १३ जि. प. गटांपैकी ७ गटातून रा.कॉ. चे सुरेश धस यांना मताधिक्य असले तरी इतर ६ गटातून भीमराव धोंडे यांना मताधिक्य असले तरी मताधिक्यात तफवात अधिक असल्याने धोंडे यांचा काठावर का होईना विजय झाला आहे.
दादेगांव गटातून ११७९, धामनगांव गटातून ३२३८, लोणी गटातून ४५०, मानूर गटातून ४३६२ मतांचे मताधिक्य, पाचंग्री गटातून ३९८६ तर तिंतरवणी जि.प.च्या गटातून सर्वाधिक ४४९७ मतांचे मताधिक्य भाजपाचे भिमराव धोंडे यांच्या पदरी पडले आहे.
रा.कॉ. चे सुरेश धस यांना दौलावडगाव गटातून ७१६, आष्टीतून ४९५, हरिनारायण आष्टा या गटातून सर्वाधिक ५८२८ ऐवढे मताधिक्य धस यांना मिळाले आहे. कडा गटातून केवळ ७६६, पाटोदा गटातून १४८२, आमळनेर गटातून १९२२ मताधिक्य मिळाले आहे. तर शिरूर जि.प.च्या गटातून केवळ ४४३ मताधिक्य हे सुरेश धस यांना पडले आहे. मताधिक्याची तफावत ही धोंडेच्या विजयासाठी महत्वाची राहिली आहे.
१भीमराव धोंडेभाजप१२०१५८
२राजेंद्र जरांगेअपक्ष७६९
३सुरेश धसराकाँ११३९५१
४वसंत धोंडेबीएसपी१२५०
५मीनाक्षी पांडुळेकाँग्रेस३३५४
६तुकाराम काळेभारिप७७७
७विष्णुपंत घोलपअपक्ष४७०
८शिवाजी थोरवेअपक्ष५१०
९महादेव नागरगोजेसीपीआय१३०३
१०अशोक दहिफळेशिवसेना२७९४
११वैभव काकडेमनसे१४३९
१२मधुकर मोरेअपक्ष८५२
मतदार संघातील आष्टी, पाटोदा, आमळनेर आदी जि.प.चे गट वगळता सुरेश धस हे मायनस मध्ये राहिले आहेत. आष्टी जि.प. गटातून सुरेश धस यांच्या पदरी १० हजार २०५ ऐवढी मते तर दुसरे प्रमुख उमेदवार भिमराव धोंडे यांना ९ हजार ७१० ऐवढी मत मिळाली आहेत. हरिनायण आष्टा गटातून सुरेश धस यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले असून त्यांच्या जामगांवातून त्यांना १७०० मताचे सर्वात जास्त मताधिक्य मिळाले आहे तर भिमराव धोंडे यांना या गावातून केवळ २० मते मिळाली आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदार संघातील प्रमुख गावात रा.कॉ. चे सुरेश धस यांना मताधिक्य मिळले आहे मात्र ग्रामीण भागात माजी. आ. सुरेश धस हे मायनस मध्ये राहिले आहेत. शिरुर कासार येथून आ. भीमराव धोंडे यांना १२२७ मध्ये तर राकाँचे सुरेश धस यांना १३४०, पाटोद्यातून धोंडे यांना २५६७ तर धस यांना २८९८, आष्टीतून धोंडे यांना २८२० तर सुरेश धस यांना ३ हजार ११४३ या प्रमाणे मताधिक्य मिळाले. मतदारसंघातील या प्रमुख शहरातून सुरेश धस यांना मताधिक्य मिळाले असले तरी ग्रामीण भागातून मात्र भाजपाचे भीमराव धोंडे यांची सरशी झाली.