चिंचोली लिंबाजी भागात कार्यक्रमाची धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:04 AM2021-03-20T04:04:37+5:302021-03-20T04:04:37+5:30
कोरोनामुळे गुरुवारी (दि. १८) नेवपूरच्या ४५ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण आहे. मात्र नियमांकडे दुर्लक्ष करीत विविध कार्यक्रम ...
कोरोनामुळे गुरुवारी (दि. १८) नेवपूरच्या ४५ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण आहे. मात्र नियमांकडे दुर्लक्ष करीत विविध कार्यक्रम ग्रामीण भागात होत आहे. गत काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून ग्रामीण भागातही रुग्ण आढळत आहे. कोरोनाची साखळी खंडित व्हावी यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेत आठवडी बाजार, शाळा, महाविद्यालयांसह, कोचिंग क्लासेस, व्यायामशाळा, धार्मिक, पर्यटन स्थळे, सार्वजनिक, सांस्कृतिक कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत लग्न व अंत्यविधी करण्यास परवानगी दिली आहे. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांवर याचा काहीच परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. लग्नतिथी अधिक असल्याने सध्या लगीनसराईची धूम आहे. शासनाने यावर निर्बंध आणले असले तरी चिंचोली लिंबाजीसह परिसरातील गावात अजूनही लग्नसमारंभाची धूम सुरू आहे. लग्नसमारंभासाठी ५० लोकांना परवानगी असली तरी लोककोरोनाची भीती न बाळगता साथरोग प्रतिबंधात्मक कायदा झुगारून अशा कार्यक्रमांना गर्दी करत आहेत. यातून कोरोनाची लागण झाली तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती जाणकार लोकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गर्दी जमवणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.