औरंगाबादेत चोरट्यांचे 'धुमधूम'; महिन्याला शंभरावर दुचाकी घेऊन चोरटे सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 06:58 PM2020-09-18T18:58:12+5:302020-09-18T19:03:22+5:30
शहराच्या विविध भागांतून मोटारसायकली चोरीला जात आहेत.
औरंगाबाद : दुचाकी चोरी रोखण्यास पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरत आहे. परिणामी, पोलिसांचा अंकुश नसलेले चोरटे शहरात दरमहा १०० हून अधिक दुचाकी पळवीत असल्याची माहिती समोर आली.
गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गुन्हे शाखेसह प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे शोध पथक कार्यरत आहे. या पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना गुन्ह्याची उकल करणे आणि गुन्हे घडणार नाही यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले जाते. मात्र, गुन्हे शाखा ते डी.बी. पथकांकडून वर्षभरापासून विशेष अशी कामगिरी झाली नाही. परिणामी, घरफोडी, दुकान फोडण्याच्या घटनांसोबत वाहनचोरी वाढली आहे. शहराच्या विविध भागांतून मोटारसायकली चोरीला जात आहेत.
मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमास येण्यास नकार दिल्याचा खा. जलील यांचा आरोपhttps://t.co/K2dMLDLVCf
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 18, 2020
दरमहा सरासरी १०० हून अधिक दुचाकी चोरी होत आहेत. वाहनचोरी का थांबत नाही, याविषयी एका निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुन्हे रोखण्यासाठी गस्त हे एक सर्वोत्तम शस्त्र आहे. पोलिसांची बहुतेक गस्त ही वाहनात बसून होते. जोपर्यंत पोलीस त्यांच्या वाहनातून खाली उतरून संशयितांची चौकशी करणार नाही, तोपर्यंत गुन्हे कमी होत नाहीत. विशेषत: रात्रीची गस्त अत्यंत जबाबदारीने करणे गरजेचे असते. रात्री उशिरा पडलेल्या व्यक्तीला पोलिसांनी रोखून दोन प्रश्न विचारले पाहिजे. त्याने समाधानकारक उत्तर न दिल्यास त्या व्यक्तीला संशयित म्हणून अटक करण्याचे पोलिसांना अधिकार आहेत. वाहनचोरीची तक्रार तात्काळ नोंदवून घेण्यास टाळाटाळ करतात. तक्रार ठाण्यात दाखल झाल्यावर एका रजिस्टरमध्ये त्याच्या दुचाकीचा क्रमांक, नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर लिहून घेऊन त्यांना गाडी शोधण्याचा सल्ला दिला जातो. नवीन पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सहा ते आठ महिन्यांपूर्वी झालेल्या घटनांची आता नोंद घेतली जात आहे.
कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह व निगेटिव्ह सांगण्याच्या सध्याच्या पद्धतीमुळे रुग्णाला इन्फेक्शन किती झाले, हे समजत नाही.https://t.co/HdEomXvjmn
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) September 18, 2020
रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर वचक नाही
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरफोडी करणारे आणि दुचाकीचोर जामीन घेऊन जेलबाहेर आले आहेत. ते पुन्हा गुन्हा करण्याची शक्यता जास्त असते. यामुळे प्रत्येक ठाणेदाराने रेकॉर्डरवरील गुन्हेगार, हिस्ट्रीसिटर यांना ठाण्यात बोलावून त्यांना ‘समज’ देणे आवश्यक असते. मात्र, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने चोरटे सुसाट फिरत आहेत.