समृद्धीच्या कामावरील अवजड वाहनांमुळे धुळेचे लोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:04 AM2021-02-24T04:04:52+5:302021-02-24T04:04:52+5:30
शेंद्रा : समृद्धी महामार्गाच्या कामावरील अवजड वाहनांमुळे परिसरात धुळेचे लोट हवेत उडत असून, यामुळे अबालवृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला ...
शेंद्रा : समृद्धी महामार्गाच्या कामावरील अवजड वाहनांमुळे परिसरात धुळेचे लोट हवेत उडत असून, यामुळे अबालवृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
समृद्धी महामार्गामुळे परिसरात विकासाची गंगा वाहणार आहे. दळणवळण यंत्रणा अधिक सोयीची झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्योग परिसरात येणार आहेत. यातून रोजगारच्या संधीही वाढणार आहेत. या मार्गाच्या कामामुळे अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. ही वाहने गावाशेजारुन नियमित ये-जा करतात; मात्र या वाहनांमुळे तसेच स्फोटानंतर होणारी धूळ ग्रामीण भागातील शेती आणि नागरिकांना मृत्यूच्या सापळ्यात ओढणारी ठरत आहे. वायू तसेच ध्वनी प्रदूषणामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाची समस्या वाढत आहे.
भरधाव धावणाऱ्या वाहनांमुळे धूळ हवेच्या संपर्कात येऊन ५०० मीटर अंतरपेक्षा जास्त दूरपर्यंत पसरते. या धुळीमुळे शेतीचेही नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
धुळीमुळे होणारे आजार...
डोळ्यांना खाज येणे/ डोळे लाल होणे, नियमित सर्दीचा त्रास होणे
श्वसनास त्रास होणे, अंगाला खाज येणे, थंडीमध्ये चेहरा आणि हात पाय काळे पडणे,
....शेतीचे होणारे नुकसान
गहू आणि ज्वारी पिकाचे दाणे बारीक पडणे, बियाणाचा कांदा बोडखा होणे, जनावरांच्या चाऱ्यावर धूळ साचल्याने अनेक आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात.
धूळयुक्त चारा खाल्ल्याने दुभती जनावरे कमी दूध देतात,
अनेक विहिरीतील पाणीही दूषित झाले आहे.
कॅप्शन
क्रेशरमुळे होत असलेली ही धूळ आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे.