जिल्ह्यात दहा हजारांच्यावर मधुमेहाचे रूग्ण
By Admin | Published: November 14, 2014 12:23 AM2014-11-14T00:23:59+5:302014-11-14T00:54:35+5:30
बीड : आरोग्याबाबत ‘अव्हेरनेस’ चा अभाव असल्याने वेळेवर आरोग्य तपासण्या न करून घेतल्याने उपचाराला विलंब होतो़ वयाच्या वीस-ऐकेवीसीतच मधुमेहा सारखा आजार होत आहे़
बीड : आरोग्याबाबत ‘अव्हेरनेस’ चा अभाव असल्याने वेळेवर आरोग्य तपासण्या न करून घेतल्याने उपचाराला विलंब होतो़ वयाच्या वीस-ऐकेवीसीतच मधुमेहा सारखा आजार होत आहे़ याला वेळीच आळा घालण्यासाठी व्यायाम, योग्य आहार व औषधोपचार या त्रिसुत्रीचा अवलंब करून मधुमेह आटोक्यात ठेवता येऊ शकतो़ आज स्थितीत जिल्ह्यात दहा हजाराच्या जवळपास मधुमेहाचे रूग्ण असल्याचे डॉ़ संजय पाटील यांनी सांगितले़
जिल्ह्यातील मधुमेह रूग्णांची मोफत तपासणी करण्याची मोहीम जिल्हा रूग्णालय प्रशासनाने मागील चार दिवसापासून हाती घेतली होती़ यामध्ये ११४ रूग्णांची तपासणी करण्यात आली़ मधुमेहाच्या रूग्णांना समुपदेशनाची नितांत गरज असल्याचे लक्षात घेवून येथील जिल्हा रूग्णालय प्रशासनाच्या वतीने तपासणी केल्यानंतर रूग्णाचे समुपदेशन करण्यात आले़ आज स्थितीत बीड जिल्ह्यात दहा हजाराच्या वर मधुमेहाचे रूग्ण आहेत़ पुर्वी मधुमेह हा वयोवृध्द व्यक्तींमध्ये आढळून येत होता़ मात्र आता आठरा वर्ष वयातील तरूणांमध्ये देखील मधुमेहाचे प्रमाण दिसून येत आहे़ यामुळे तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे़ जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यातील आकडेवाडी नुसार जिल्ह्ययात दहा हजाराच्या जवळपास मधुमेहाचे रूग्ण आहेत़ मात्र खाजगी दवाखाण्यांमधूनही उपचार घेतले जातात़ यामुळे पंचेवीस हजाराच्या जवळपास मधुमेहाचे रूग्ण जिल्ह्यात असण्याची शक्यता असल्याचे मेडिकल क्षेत्रातील तंज्ञांचे म्हणणे आहे़
त्रिसुत्रीचा ‘युज’़़़ ‘डायबेटीज’ गुल
डायबेटिजच्या रूग्णांनी सहा महिन्यातून एकदा आपल्या आरोग्य तपासण्या करून घेणे आवश्यक आहे़ याशिवाय व्यायाम, योग्य आहार व औषधोपचार ही त्रिसुत्री जर मधुमेहाच्या रूग्णांनी आमलात आनली तर आजार आटोक्यात ठेवता येऊ शकतो़ नाहीतर डोळ्यांचे आजार अथवा जखम झाली तर ती भरून न येणे असे आजार फोफावू शकतात़ असे तज्ञांनी सांगितले़