कर्मचाºयाचे कागदोपत्रीच निलंबन;चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:09 AM2017-08-28T00:09:11+5:302017-08-28T00:09:11+5:30
जिल्हा दक्षता समितीत शिष्यवृत्ती योजनेच्या लाभासाठी समाज कल्याण विभागाचा कर्मचारी एस. एस. इंगोले याच्याबद्दल खुद्द खा. राजीव सातव यांनी तक्रार केली होती. संबधिताला निलंबित केल्याचे इतिवृत्तात म्हटले मात्र प्रत्यक्षात त्याचा विभागच बदलला होता, अशी तक्रार समाजवार्दी पार्टीचे जिल्हाध्यक्ष शेख नईम शेख लाल यांनी निवेदनाद्वारे समाजकल्याण सचिवाकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा दक्षता समितीत शिष्यवृत्ती योजनेच्या लाभासाठी समाज कल्याण विभागाचा कर्मचारी एस. एस. इंगोले याच्याबद्दल खुद्द खा. राजीव सातव यांनी तक्रार केली होती. संबधिताला निलंबित केल्याचे इतिवृत्तात म्हटले मात्र प्रत्यक्षात त्याचा विभागच बदलला होता, अशी तक्रार समाजवार्दी पार्टीचे जिल्हाध्यक्ष शेख नईम शेख लाल यांनी निवेदनाद्वारे समाजकल्याण सचिवाकडे केली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, समाज कल्याण विभागाचे तत्कालीन वरिष्ठ लीपीक शेषराव इंगोले यांच्याकडे शिष्यवृत्ती विभागाचा पदभार असताना त्यांनी प्रत्येक कॉलेज व संस्थेकडून पैसे घेतल्याशिवाय प्रस्ताव मंजूर केले नाहीत. तसेच त्यांनी खा. राजीव सातव यांच्या संस्थेलाही प्रस्ताव मंजुरीसाठी पैसे मागितले होते. त्यामुळे खा. सातव यांनी जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये ही बाब उपस्थित केली होती. त्यावेळी जिल्हाधिकाºयांनी इंगोले यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून विशेष पथकामार्फत चौकशीचे आदेशही दिले होते. परंतु शेषराव इंगोले यांच्याविरूद्ध कारवाई तर सोडाच; निलंबनाची कारवाईही केवळ नावालाच केल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे दक्षता समितीच्या इतिवृत्तात त्याची नोंदही आहे. त्यावर जिल्हाधिकाºयांची स्वाक्षरी आहे. मात्र इंगोलेवर निलंबनाची नव्हे, तर विभाग बदलण्याची कारवाई झाली आहे. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करून शेषराव इंगोले यांना निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी शेख नईम शेख लाल यांनी निवेदनाद्वारे केली आहे.