दिवसभर कॉलेज केलं, मित्रांसोबत वेळ घालवला; सायंकाळी हॉस्टेलमध्ये संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 12:25 PM2023-07-27T12:25:49+5:302023-07-27T12:25:58+5:30

शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतिगृहातील घटना, कारण अस्पष्ट

Did college all day, spent time with friends; Ended life in the hostel in the evening | दिवसभर कॉलेज केलं, मित्रांसोबत वेळ घालवला; सायंकाळी हॉस्टेलमध्ये संपवलं जीवन

दिवसभर कॉलेज केलं, मित्रांसोबत वेळ घालवला; सायंकाळी हॉस्टेलमध्ये संपवलं जीवन

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : दिवसभर महाविद्यालयात सर्व लेक्चरला हजर राहिला, मित्रांसोबत वेळ घालवून प्रॅक्टिकलदेखील केले. त्यानंतर सायंकाळी वसतिगृहाच्या खोलीतील मित्र पुस्तक खरेदीसाठी जाताच १७ वर्षाच्या कृष्णा लहू क्षीरसागर याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली.

मूळ मानवतचा असलेला कृष्णा शासकीय तंत्रनिकेतनच्या सिव्हिल पदविकेच्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. हुशार विद्यार्थी म्हणून तो ओळखला जाई. पाचही सेमिस्टरमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत आला होता. मंगळवारी नेहमीप्रमाणे त्याने सर्व लेक्चरला उपस्थिती लावली. नियोजित प्रॅक्टिकललादेखील तो हजर होता. या दरम्यान वर्गमित्रांसोबत रोजच्याप्रमाणेच वागला. महाविद्यालय संपवून सायंकाळी सहा वाजता ते सर्व खोलीवर परतले. पुस्तके खरेदी करायचे असल्याने खोलीतील मित्र बाहेर गेले. त्यांनी कृष्णाला सोबत चलण्यासाठी विचारणादेखील केली. मात्र, कृष्णाने नकार दिला. साधारण आठ वाजता मित्र परतले असता दरवाजा बंद होता. वारंवार आवाज देऊनही प्रतिसाद येत नसल्याने वॉर्डनने धाव घेतली. त्यांनी दरवाजातून डोकावून पाहिल्यावर कृष्णा लटकलेल्या अवस्थेत आढळला.

मूळ मानवतचा
दहावीनंतर शहरात शिकण्यासाठी आलेल्या कृष्णाला दोन बहिणी असून मानवतला कुटुंब राहते. त्याच्या वडिलांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. कृष्णाला अभियंता व्हायचे होते. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, हे मात्र कळू शकले नाही. पोलिसांनी त्याची खोली तपासली. मात्र, तेथेदेखील ‘सुसाईड नोट’ आढळली नाही.

Web Title: Did college all day, spent time with friends; Ended life in the hostel in the evening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.