अर्ज केला का? छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील ११४ पदांची भरती प्रक्रिया सुरू

By मुजीब देवणीकर | Published: August 23, 2023 05:29 PM2023-08-23T17:29:12+5:302023-08-23T17:29:31+5:30

१२ सप्टेंबरपर्यंत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची मुभा

Did you apply? Recruitment process for 114 posts in Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation has started | अर्ज केला का? छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील ११४ पदांची भरती प्रक्रिया सुरू

अर्ज केला का? छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील ११४ पदांची भरती प्रक्रिया सुरू

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेत ११४ कायमस्वरूपी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. बुधवार (२३ ऑगस्ट)पासून उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल. १२ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुभा राहणार आहे.

मागील काही वर्षांपासून महापालिकेत भरतीसाठी खल सुरू होता. शासनाने नवीन आकृतिबंध मंजूर केल्यानंतरही भरती प्रक्रियेला विलंब होत होता. तत्कालीन आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, अभिजित चौधरी यांनीही बरेच प्रयत्न केले. जी. श्रीकांत यांनी पहिल्या टप्प्यातील मंजूर ११४ पदे भरण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मंगळवारी जाहीर प्रगटन देण्यात आले. महापालिकेच्या वेबसाइटवर अर्ज उपलब्ध असून, उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज भरावे लागतील. आरोग्य, लेखा, लेखापरीक्षण, उद्यान, अभियांत्रिकी, अग्निशमन विभागातील ‘गट-क’मधील ही भरती आहे. वेबसाइटवर प्रत्येक पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यदा, ऑनलाइन शुल्क इ.चा तपशील देण्यात आला आहे. हजारोंच्या संख्येने मनपाला अर्ज प्राप्त होतील, अशी अपेक्षा आहे. भरती प्रक्रिया मनपा प्रशासन राबविणार का, शासन नियुक्त एजन्सी, याचा तपशील मनपाकडून देण्यात आला नाही.

२३०० पदे रिक्त
महापालिकेत नवीन आकृतिबंधानुसार ५ हजार ७१९ पदे मंजूर आहेत. त्यातील ३ हजार ४३२ पदांवर अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. जवळपास २३०० पदे रिक्त आहेत. रिक्त पदांचा हा अनुशेष दर महिन्याला वाढतच चालला आहे. कारण मागील अनेक वर्षांपासून मनपात भरती प्रक्रियाच राबविण्यात आलेली नाही.

११ कनिष्ठ अभियंते भरले
सात वर्षांपूर्वी मनपात ११ कनिष्ठ अभियंते भरण्यात आले. त्यातील काहीजण मनपातील नोकरी सोडून निघून गेले. त्यानंतर मनपात भरती प्रक्रियाच राबविण्यात आली नव्हती.

अशी आहेत पदे
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)- २६
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)- ७
कनिष्ठ अभियंता (विद्युत)- १०
लेखापरीक्षक- १
लेखापाल - २
विद्युत पर्यवेक्षक- ३
अभियांत्रिकी सहायक - १३
स्वच्छता निरीक्षक- ७
पशुधन पर्यवेक्षक- २
प्रमुख अग्निशमन अधिकारी - ९
अग्निशमन अधिकारी -२०
कनिष्ठ लेखापाल- २
लेखा विभाग लिपिक- ५

Web Title: Did you apply? Recruitment process for 114 posts in Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation has started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.