नागपूर-औरंगाबाद शिवशाही बसची डिझेल टाकी फुटली; सुदैवाने दुर्घटना टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 11:07 PM2018-10-07T23:07:21+5:302018-10-07T23:10:18+5:30
शिवशाही बसच्या अपघाताचे सत्र सुरुच
औरंगाबाद : शिवशाही बसच्या अपघाताचे सत्र सुरुच आहे. नागपूर-औरंगाबाद शिवशाही बसची डिझेल टाकी फु टल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सिडको बसस्थानकात घडली. एसटी महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाºयांनी वेळीच खबरदारी घेतल्याने सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
नागपूर-औरंगाबाद शिवशाही बस (एमएच-०९, ईएम-१९४१)औरंगाबादला येईपर्यंत जवळपास १५ प्रवासी होते. ही बस सिडको बसस्थाकात दाखल होताना प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावरील खड्डेमय परिस्थितीमुळे डिझेल टाकीला धक्का लागला. त्यातून डिझेल टाकी फुलटी आणि इंदनाची धारच लागली. इंधनाची गळती होत असल्याचा प्रकार लक्षात येताच आगार व्यवस्थापक पी. पी. देशमुख यांनी स्वत: खबरदारी घेत प्रयत्न केले.गळतीमुळे बसस्थानकात मोठ्या प्रमाणात डिझेल पसरले. त्यामुळे प्रवाशांमध्येही भिती पसरली. बसस्थानकातील अधिकारी-कर्मचाºयांची एकच धावपळ झाली. ही बस जागेवरच थांबवून प्रवाशांना उतरविण्यात आले. गळती होणारे डिझेल बसस्थानकात कचरा टाकण्यासाठी ठेवण्यात आलेल्या डस्टबिनमध्ये गोळा करण्यात आले. तीन डस्टबिन इंधनाने भरून गेले.
इंधनाच्या गळतीमुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. परंतु वेळीच घेण्यात आलेल्या खबरदारीमुळे कोणत्याही अपघाताला सामोरे जावे लागले नाही. या घटनेची एसटी कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये एकच चर्चा सुरु होती.