नाताळनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 09:51 PM2018-12-24T21:51:02+5:302018-12-24T21:51:20+5:30
प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्मोत्सवानिमित्त ख्रिश्चन समाजाच्या वतीने मंगळवारी वाळूज महानगर परिसरातील चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वाळूज महानगर : प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्मोत्सवानिमित्त ख्रिश्चन समाजाच्या वतीने मंगळवारी वाळूज महानगर परिसरातील चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रभु येशु ख्रिस्त यांचा जन्मदिन ख्रिसमस उत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ख्रिसमस निमित्त ख्रिश्चन धर्मिय समाज बांधवातर्फे वाळूज, बजाजनगर, जोगेश्वरी, वळदगाव, साजापूर आदी ठिकाणी चर्चमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सोमवारी (दि.२४) केक कापूर प्रभू येशु ख्रिस्त यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. मंगळवारी सकाळी १० वाजता प्रार्थना, येशु जन्माचा देखावा त्यानंतर प्रभू येशु ख्रिस्त यांना धन्यवाद देवून संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी कामना करण्यात येणर आहे. सायंकाळी धर्मगुरु यांचे बायबलवर आधारित प्रवचन होणार आहे. ख्रिसमस निमित्त विविध ठिकाणच्या चर्चची रंगरंगोटी करुन आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विद्युत रोषणाईने चर्च परिसर उजळून निघाला आहे.