दिलासा, जिल्ह्यात पुन्हा कोरोनामृत्यू टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:04 AM2021-01-21T04:04:46+5:302021-01-21T04:04:46+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला. औरंगाबादेत २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. ...
औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला. औरंगाबादेत २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मात्र, दिवसभरात ५८ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ५५ जण कोरोनामुक्त झाले.
जिल्ह्यात एकूण ४६ हजार ६२५ रुग्णांची नोंद झाली असून, आतापर्यंत ४५ हजार १४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत १ हजार २२८ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या २४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ५८ रुग्णांत मनपा हद्दीतील ५०, ग्रामीण भागातील ८ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ५० आणि ग्रामीण भागातील ५, अशा एकूण ५५ रुग्णांना बुधवारी सुट्टी देण्यात आली.
मनपा हद्दीतील रुग्ण
नारेगाव १, एमजीएम हॉस्पिटल परिसर १, एन-७, सिडको १, गारखेडा परिसर २, प्रतापनगर १, उत्तरानगरी १, एन -४ सिडको १, एन-३, सिडको १, सुरेवाडी हर्सुल, पिसादेवी १, घाटी परिसर १, हर्सुल १, एन दोन, रामनगर १, पूजा पार्क, पडेगाव २, छावणी परिसर १, अन्य ३४
ग्रामीण भागातील रुग्ण
आडगाव २, अन्य ६