छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची नियुक्ती
By विकास राऊत | Published: February 14, 2024 05:58 PM2024-02-14T17:58:57+5:302024-02-14T18:01:51+5:30
सध्या आस्तिककुमार पाण्डेय प्रशासकीय प्रशिक्षणासाठी मसुरीला आहेत
छत्रपती संभाजीनगर: जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचा महापालिका आणि जिल्हा प्रशासनातील सुमारे चार वर्षातील कार्यकाळाचा विचार करता त्यांची निवडणूक आयोगाच्या नियमांमुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदली अपेक्षित होती. सध्या पाण्डेय प्रशासकीय प्रशिक्षणासाठी मसुरीला असून त्यांच्या जागेवर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले सोलापूर जि. प.चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची बदली करण्यात आली आहे. शासनाने त्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत.
दिलीप स्वामी छत्रपती संभाजीनगरचे नवीन जिल्हाधिकारी #chhatrapatisambhajinagarpic.twitter.com/GbF9ceKmfT
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) February 14, 2024
एमएमआरडीएचे सहसचिव दीपक सिंघला, सिडकोला मुख्य प्रशासक या पदावर बदली हाेऊनही अद्याप रुजू न झालेल्या भाग्यश्री विसपुते ही नावे देखील जिल्हाधिकारी होण्यासाठी स्पर्धेत होती. राज्यातील २४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी पदाचा समावेश नव्हता. दिलीप स्वामी यांचे नाव चर्चेत होते.