मालमत्ता करासाठी थेट जप्तीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2016 12:56 AM2016-05-30T00:56:03+5:302016-05-30T01:14:24+5:30
औरंगाबाद : दरवर्षी महापालिका चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुलीवरच भर देत होती. सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांनी कर
औरंगाबाद : दरवर्षी महापालिका चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुलीवरच भर देत होती. सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांनी कर न भरल्यास थकबाकी मालमत्ताधारकांच्या नावावर जमा होते. मात्र, या वसुलीकडे मनपाने कधीच लक्ष दिले नाही.
कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांवर थेट जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. वॉर्डनिहाय मोठ्या थकबाकीदारांची यादी करून जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. वॉर्ड ‘ड’ कार्यालयांतर्गत काही व्यावसायिकांनी १० लाख ९८ हजार रुपये एवढा कर थकविला होता. त्यांच्या चारही दुकानांना सील ठोकण्यात आले. उपायुक्त अय्युब खान, वॉर्ड अधिकारी एस. आर. जरारे, एच. एम. सन्नान्से, के. पी. घुगे, विजय मुळे, एस. व्ही. सुदेवाड, संजय साबळे आदींनी ही कारवाई केली. पैसे भरल्यानंतर सील उघडण्यात आले. जालना रोडवरील आणखी एका मालमत्ताधारकांकडे तब्बल २० लाखांची थकबाकी होती. १३ लाख रुपये मनपाकडे जमा केले.