‘रंग दे बसंती’ ची कथा चोरल्याच्या आरोपातून दिग्दर्शक राकेश मेहरा दोषमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 03:03 PM2021-11-13T15:03:25+5:302021-11-13T15:05:37+5:30

मुश्ताक मोहसिन मुबारक हुसेन हे चित्रपट कथा लेखक असून त्यांनी ‘रंग दे बसंती’ या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा व सहदिग्दर्शक रोनी स्क्रुवाला यांच्याविरोधात कथा चोरल्याचा ( कॉपी राईट कायद्याचे उल्लंघन ) खटला न्यायालयात दाखल केला होता.

Director Rakesh Mehra free from the case of stealing the story of 'Rang De Basanti' | ‘रंग दे बसंती’ ची कथा चोरल्याच्या आरोपातून दिग्दर्शक राकेश मेहरा दोषमुक्त

‘रंग दे बसंती’ ची कथा चोरल्याच्या आरोपातून दिग्दर्शक राकेश मेहरा दोषमुक्त

googlenewsNext

औरंगाबाद : ‘रंग दे बसंती’ या चित्रपटाची कथा चोरल्याच्या मुश्ताक मोहसीन मुबारक हुसेन यांनी केलेल्या आरोपातून चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश मेहरा यांना दोषमुक्त करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एच . खेडकर यांनी दिला.

औरंगाबादेतील रहिवासी मुश्ताक मोहसिन मुबारक हुसेन हे चित्रपट कथा लेखक असून त्यांनी ‘रंग दे बसंती’ या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा व सहदिग्दर्शक रोनी स्क्रुवाला यांच्याविरोधात कथा चोरल्याचा ( कॉपी राईट कायद्याचे उल्लंघन ) खटला न्यायालयात दाखल केला होता. या प्रकरणात सुनावणी सुरु असताना चित्रपटाचे सहदिग्दर्शक रोनी स्क्रवाला यांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या कृतीला आव्हान दिले होते. त्यात न्यायालयाने रोनी स्क्रवाला यांच्या बाजूने निकाल दिला होता व त्यामुळे रोनी यांच्याविरोधातील गुन्हा रद्दबातल झाला होता. त्यानंतर दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी ॲड. दीपक एस. मनुरकर यांच्यामार्फत मूळ फौजदारी प्रकरणात अर्ज (डिस्चार्ज ॲप्लिकेशन) सादर करुन त्यांना कॉपी राईट कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपामधून मुक्त करण्याची विनंती केली होती.

मुश्ताक मोहसीन मुबारक हुसेन यांचा असा आरोप होता की, त्यांनी ‘इन्कलाब’ नावाची चित्रपटाची कथा लिहिली होती. ती असोसिएशनकडे नोंदणीकृत केली होती. १९९९ साली ही कथा दिग्दर्शक राकेश मेहरा यांना ऐकवली होती. त्यानंतर मेहरा यांनी या कथेवर २००६ मध्ये ‘रंग दे बसंती’ चित्रपट तयार केला आहे. ही आपल्या कथेची चोरी आहे. न्यायालयात ॲड. दीपक मनुरकर यांनी युक्तिवाद केला की, मुश्ताक मोहसीन यांनी त्यांची मूळ कथा रजिस्ट्रर केलेली नाही. या मुद्द्यावर सहदिग्दर्शक रोनी स्क्रवाला यांचा अर्ज न्यायालयाने मंजूर केलेला आहे. मुश्ताक मोहसीन यांनी त्याविरुध्द वरिष्ठ न्यायालयात अपीलही केलेले नाही. त्यामुळे या प्रकरणी कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन सिध्द होत नाही. अशा वेळी दोषारोप केल्यास तो आधारहीन ठरेल.

Web Title: Director Rakesh Mehra free from the case of stealing the story of 'Rang De Basanti'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.