शिकाऊ वाहनचालकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:02 AM2021-01-25T04:02:11+5:302021-01-25T04:02:11+5:30
रिक्षांना मीटर सक्ती करा औरंगाबाद : शहरात मीटरप्रमाणे प्रवासी वाहतूक सक्तीची करण्यात यावी, त्यासाठी रिक्षा चालक सर्व प्रकारची मदत ...
रिक्षांना मीटर सक्ती करा
औरंगाबाद : शहरात मीटरप्रमाणे प्रवासी वाहतूक सक्तीची करण्यात यावी, त्यासाठी रिक्षा चालक सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहेत, अशी मागणी रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती महासंघाचे अध्यक्ष निसार अहेमद खान यांनी एका निवेदनाद्वारे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
रेल्वेची निवासस्थानांना कचऱ्याचा विळखा
औरंगाबाद : रेल्वे स्टेशन परिसरातील कर्मचारी निवासस्थाने कचऱ्याच्या विळख्यात सापडली आहे. परिसरात जागोजागी कचरा साचत आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. कचरा उचलला जात नसल्याने जाळून नष्ट करण्याची वेळ ओढावत आहे.
बसेस फलाटावर उभ्या राहिनात
औरंगाबाद : मध्यवर्ती बस स्थानकात ग्रामीण भागाच्या अनेक बसेस फलाटावर उभ्या करण्याऐवजी मिळेल, त्या जागेत उभ्या केल्या जात आहे. त्यामुळे बस कुठे उभी आहे, याची शोधाशोध करण्याची वेळ प्रवाशांवर ओढावत आहे. याकडे एसटी महामंडळ प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
जिल्हा रुग्णालयात पार्टिशियनचे सांगाडे पडून
औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी पार्टिशियनद्वारे स्वतंत्र कक्षांची रचना करण्यात आली होती, परंतु रुग्णांची संख्या वाढल्यानंतर अतिरिक्त खाटा वाढविण्यासाठी हे पार्टिशियन कक्ष हटविण्यात आले. काही महिन्यांपासून पार्टिशियनचे सांगाडे पडून रुग्णालयात पडून आहे. त्यांचा वापर आता कशासाठी केला जावा, याचा विचार आरोग्य यंत्रणेकडून केला जात आहे.