अग्निशमनचे ना-हरकत प्रमाणपत्र नसलेल्यांची परवानगी रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 09:36 PM2019-05-27T21:36:37+5:302019-05-27T21:37:12+5:30
अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र नसलेल्या खाजगी शिक वणी वर्गांची परवानगी रद्द करून त्यांच्या मालमत्ता सील कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने सोमवारी मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे यांच्याकडे केली आहे.
औरंगाबाद : अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र नसलेल्या खाजगी शिक वणी वर्गांची परवानगी रद्द करून त्यांच्या मालमत्ता सील कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने सोमवारी मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे यांच्याकडे केली आहे.
गुजरातची आर्थिक राजधानी असलेल्या सुरतमध्ये शुक्रवारी खासगी शिकवणी वर्गामध्ये झालेल्या अग्निकांडात २० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. चार मजली इमारतीत शॉर्टसर्किटमुळे आग लागली. तळमजल्यावर लागलेली आग पाहून विद्यार्थ्यांनी वरच्या मजल्याकडे धाव घेतली. आग नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी चौथ्या मजल्यावरून उड्या मारून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला.
औरंगाबादेतील ९० टक्के खाजगी शिकवणी वर्गचालकांकडे अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून, विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्यांच्या मालमत्ता सील करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे.
यावेळी शहराध्यक्ष संकेत शेटे, रियाज पटेल, विशाल आमराव, अशोक म्हस्के, आनंद खरात, योगेश खाडे, राहुल शिंदे, सागर जाधव, रमेश पुरी, किरण खैरे, जयदीप लोखंडे, विशाल भालेराव, कृष्णा भुसारे, ज्ञानेश्वर जाधव, अभिषेक जाधव यांची उपस्थिती होती.