कें द्रीय पुरातत्व विभागाचा अडेलतट्टूपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:54 AM2018-08-25T00:54:19+5:302018-08-25T00:55:59+5:30
पर्यटन स्थळ म्हणून विकसित असलेल्या राज्यातील अनेक वास्तू केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास करून पर्यटनाला चालना देण्याच्या मोठ्या संधी आहेत. मात्र, केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अडेलतट्टू धोरणामुळे विकास रखडलेला असल्याचा आरोप राज्याचे पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांनी केला.
औरंगाबाद : पर्यटन स्थळ म्हणून विकसित असलेल्या राज्यातील अनेक वास्तू केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास करून पर्यटनाला चालना देण्याच्या मोठ्या संधी आहेत. मात्र, केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अडेलतट्टू धोरणामुळे विकास रखडलेला असल्याचा आरोप राज्याचे पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांनी केला.
पर्यटन विभागाच्या नेतृत्वात औरंगाबादेत आयोजित जागतिक बौद्ध परिषदेचे आयोजन केले आहे. यासाठी २९ बुद्धिस्ट देशांतील २०० प्रतिनिधी आले आहेत. या प्रतिनिधींमुळे राज्याचे पर्यटन जागतिक स्तरावर पोहोचले आहे. या परिषदेचे भारतात पहिल्यांदाच आयोजन केले जात असून, त्याचा मान महाराष्ट्राला मिळाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील पर्यटनातील अडचणी आणि उपाययोजना विषयी प्रसारमाध्यमांशी जयकुमार रावल बोलत होते. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या अनेक ऐतिहासिक वास्तूच्या ठिकाणी पायाभूत सुविधा, पर्यटकांना आकर्षित केले जाईल, असे उपक्रम राबवता येऊ शकातात. त्या ठिकाणी हा विभाग सोयी-सुविधा पुरवत नाही. त्या पुरविण्यासाठी राज्य सरकार तयार आहे. मात्र, त्यासाठी परवानगीही देण्यात येत नाही. अनेक योजना अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे पडून आहेत. त्याची अंमलबजावणी होत नसल्याचेही रावल यांनी स्पष्ट केले. राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे. यात पर्यटकांसाठी लागणाºया अत्यावश्यक सेवा-सुविधापासून प्रत्येक गोष्टीचा साकल्याने विचार करीत आहे. त्यात कोणत्याही प्रकारची कमतरता होणार नाही. याकडे राज्य सरकार जाणीवपूर्वक लक्ष देत आहे. यात महत्त्वाचे म्हणजे, औरंगाबाद ते जळगाव, चंद्रपूर, लोणार, सिंधुदुर्ग या ठिकाणांना कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकाच ठिकाणाहून राज्यातील प्रत्येक पर्यटन स्थळाच्या ठिकाणी जाण्यासाठी पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, तिकीट, निवास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकाच ठिकाणाहून सर्व काही
पर्यटन विभाग पर्यटकांना एकाच ठिकाणाहून राज्यातील कोणत्याही पर्यटनस्थळाच्या ठिकाणची निवास व्यवस्था, वाहतूक, तिकीट आणि दिवसभर वास्तू पाहिल्यानंतर सायंकाळी मनोरंजनाची साधने उपलब्ध करून देईल. यामुळे येणारा प्रत्येक पर्यटक आपल्या भागातील नागरिकांना महाराष्ट्रातील पर्यटनासाठी पाठवून देईल, अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही रावल यांनी सांगितले.