उपसभापतीवरील अविश्वास फेटाळला
By Admin | Published: September 9, 2015 12:14 AM2015-09-09T00:14:00+5:302015-09-09T00:14:00+5:30
औसा : औसा पंचायत समितीचे उपसभापती दिनकर मुगळे यांच्याविरुद्ध शिवसेनेचे संदीपान शेळके व भाजपाचे पद्माकर चिंचोलकर यांच्यासह ९ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता़
औसा : औसा पंचायत समितीचे उपसभापती दिनकर मुगळे यांच्याविरुद्ध शिवसेनेचे संदीपान शेळके व भाजपाचे पद्माकर चिंचोलकर यांच्यासह ९ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता़ या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी ८ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पं़ स़ सभागृहात विशेष सभा बोलाविण्यात आली होती़ पण या सभेला १८ पैकी ९ च सदस्य हजर असल्यामुळे हा ठराव गणपूर्ती अभावी फेटाळण्यात आला असल्याचे जाधव यांनी सांगितले़
औसा पंचायत समितीचे उपसभापती दिनकर मुगळे हे कार्यालयीन कामासाठी वेळ देत नाहीत़ मनमानी कारभार करतात़ सदस्यांना विश्वासात घेत नाहीत़ तसेच विकास कामाच्या देयके संशयास्पद असल्याचे कारण पुढे करुन अविश्वास ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला होता़ १८ पैकी ९ सदस्यांनी हा ठराव दाखल केला होता़ मात्र ठरावाच्या विशेष सभेला ९ सदस्य गैरहजर राहिल्याने तो फेटाळण्यात आला़