वीज कनेक्शन तोडणे बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:04 AM2021-03-17T04:04:57+5:302021-03-17T04:04:57+5:30
औरंगाबाद : महावितरण कंपनीकडून कुठलीही पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांकडे ...
औरंगाबाद : महावितरण कंपनीकडून कुठलीही पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांकडे बिल भरण्यासाठी रक्कम नाही. त्यामुळे ही मोहीम कंपनीने बंद न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करेल. असा इशारा शहराध्यक्ष सतनाम गुलाटी व इतरांनी दिला आहे.
अर्धा कि.मी.लाबून जावे लागते तहसीलकडे
औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयातून अप्पर तहसील आणि ग्रामीण तहसीलकडे जाणारा मधला मार्ग प्रशासनाने बंद केल्यामुळे अर्धा कि.मी.लांबून वळसा घेत नागरिकांना त्या कार्यालयांकडे जावे लागते आहे. सदरील मार्ग खुला करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कार्यालयात पिण्याचे पाणी मिळेना
औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांसाठी आलेल्या अभ्यागतांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली असून नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
साजापूर-शरणापूर रस्ता चौपदरीकरणासाठी ५४ कोटी
औरंगाबाद: साजापूर ते शरणापूर या पाच कि.मी.च्या रस्त्यासाठी शासनाकडून ५४ कोटी मिळणार असल्याचे आ.संजय शिरसाट यांनी कळविले आहे. मागील महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद दौरा केला होता. त्यावेळी साजापूर-करोडी-शरणापूर या रस्त्यासाठी निधी कमी पडत असल्याचे आ. शिरसाट यांनी निदर्शनास आणूण दिले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री ठाकरे व बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी अर्थसंकल्पात मंजुरी दिली. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात ३८ कोटी ६७ लाख रुपये मंजूर केले आहे. ५४ कोटी या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध झाला आहे.