विजेचा खांब पडल्याने पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 09:36 PM2019-06-11T21:36:50+5:302019-06-11T21:37:03+5:30
वाळूज एमआयडीसी परिसरातील एफ सेक्टरमध्ये सोमवारी सायंकाळी विजेचा खांब पडल्यामुळे या भागातील वीज पुरवठा २४ तास खंडीत झाला होता.
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील एफ सेक्टरमध्ये सोमवारी सायंकाळी विजेचा खांब पडल्यामुळे या भागातील वीज पुरवठा २४ तास खंडीत झाला होता.
वाळूज एमआयडीसी परिसरात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दरम्यान, वादळी वाºयामुळे एफ सेक्टरमधील विजेचे दोन खांब पडल्यामुळे सायंकाळी ५ वाजेपासून या परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे ६ ते ७ उद्योगांचा वीज पुरवठा खंडीत झाल्याने कारखान्यातील उत्पादन प्रक्रिया ठप्प होती.
उद्योजकांनी महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. मात्र्न, दुरुस्तीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरुच होते. त्यामुळे उद्योजकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरु राहिल्यामुळे या भागातील ६ ते ७ कारखाने बंदच होते.
काही उद्योजकांनी जनरेटरच्या मदतीने उद्योग सुरु ठेवले. महावितरणच्या वेळकाढु धोरणामुळेच या सेक्टरमधील उद्योजकांना गैरसोयीचा सामना करावा लागल्याचा आरोप मसिआचे माजी अध्यक्ष अशोक काळे यांनी केला आहे. महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेश भगत म्हणाले की, एफ सेक्टरमधील दोन विजेचे खांब पडल्यामुळे या भागातील काही कारखान्यांचा वीज पुरवठा बंद झाला.
मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास या सेक्टरमधील वीज पुरवठा सुरळीत सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी पडेगाव सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वाळूज एमआयडीसी व नागरी वसाहतीतील वीज पुरवठा जवळपास एक ते दीड तास खंडीत झाला होता.