वाहन खरेदीच्या विषयावर होणार चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 12:35 AM2017-11-02T00:35:36+5:302017-11-02T00:35:42+5:30
शुक्रवारी होणाºया महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पाणीपुरवठा व इमारत दुरुस्तीसाठी २५ लाखांची तरतूद, वाहनांची खरेदी यासह इतर १६ विषय चर्चेसाठी ठेवले असून, याच सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांचीही निवड होणार असल्याने सभेला महत्त्व प्राप्त झाले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शुक्रवारी होणाºया महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पाणीपुरवठा व इमारत दुरुस्तीसाठी २५ लाखांची तरतूद, वाहनांची खरेदी यासह इतर १६ विषय चर्चेसाठी ठेवले असून, याच सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांचीही निवड होणार असल्याने सभेला महत्त्व प्राप्त झाले आहे़
३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता येथील बी़ रघुनाथ सभागृहामध्ये ही सभा होणार आहे़ या सभेत ३ स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार असल्याने इच्छुकांनी महिनाभरापासूनच मोर्चे बांधणी केली आहे़
३ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष निवड होणार असल्याने उत्सुकता ताणली गेली आहे़ या सर्वसाधारण सभेत विविध विषय ठेवण्यात आले आहेत़ त्यात धाररोडवरील डम्पींग ग्राऊंडमध्ये कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी १४ व्या वित्त आयोगातून ४ लाख रुपयांना मंजुरी देणे, शहरातील प्लॅटर आॅफ पॅरिशच्या मूर्तींना बंदी घालणे, अनिवासी मालमत्तांच्या स्वच्छतेसाठी सेवा शुल्क लावणे, वाहनांची खरेदी करणे़, मनपाच्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यासाठी ३४ लाख रुपयांची तरतूद करणे, स्लॉटर हाऊसच्या वेस्ट प्रोसेसिंगसाठी १४ व्या वित्त आयोगातून ३ कोटी ५० लाखांची तरतूद करणे, जेसीबी मशीनची खरेदी, पाणीपुरवठा दुरुस्ती आणि इमारतींच्या दुरुस्तीसाठी २५ लाख रुपयांची तरतूद करणे आदी विषयांवर चर्चा होणार आहे़ मनपाने या सभेची तयारी केली आहे़