नात्याला काळिमा ! सावत्र मामाचा अल्पवयीन भाचीवर तीन वेळा अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 11:44 AM2022-04-30T11:44:05+5:302022-04-30T11:45:02+5:30

आरोपी गुन्हा दाखल झाल्याचे माहीत होताच फरार झाला.

Disgrace the relationship! In-law mama raped minor niece three times | नात्याला काळिमा ! सावत्र मामाचा अल्पवयीन भाचीवर तीन वेळा अत्याचार

नात्याला काळिमा ! सावत्र मामाचा अल्पवयीन भाचीवर तीन वेळा अत्याचार

googlenewsNext

औरंगाबाद : उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन भाचीवर सावत्र मामाने तीन वेळा अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपी गुन्हा दाखल झाल्याचे माहीत होताच फरार झाला. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक तैनात केले आहे.

उस्मानपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या हद्दीत एक व्यक्ती कुटुंबासह राहते. त्यास चार पत्नी होत्या. त्यातील दोन पत्नी मयत झाल्या आहेत. पहिल्या पत्नीला दोन मुले, दुसऱ्या पत्नीला दोन मुली आहेत. तिसरी पत्नी सोडून गेल्यानंतर त्याने चौथे लग्न केले. दुसऱ्या पत्नीच्या दोन मुलींपैकी एक जण आजीकडे राहत होती. काही दिवसांपूर्वी ती वडिलांकडे राहण्यास आली. २५ एप्रिल रोजी चौथ्या पत्नीचा भाऊ हा बहिणीकडे आला होता. तेव्हा त्याने १३ वर्षीय सावत्र भाचीवर सायंकाळी ५ वाजेनंतर जबरदस्तीने तीन वेळा अत्याचार केले. या अत्याचारामुळे घाबरलेल्या मुलीने त्या दिवशी कोणालाही काही सांगितले नाही. तिला त्रास होत असल्यामुळे सतत रडत होती. त्यामुळे वडिलांनी तिला पहिल्या पत्नीच्या मुलास बोलावून घेत आजीकडे घेऊन जाण्यास सांगितले.

आजीकडे जाताना पीडितेने सावत्र भावास घडलेला प्रसंग सांगितला, तसेच आजीलाही घरी पोहोचल्यावर घटना सांगितली. त्यानंतर मुलीची आजी, चुलत्याने थेट उस्मानपुरा पोलीस ठाणे गाठत २८ एप्रिल रोजी तक्रार दिली. त्यानुसार निरीक्षक गीता बागवडे यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत पोक्सो कायद्यानुसार अत्याचाराचा गुन्हा नोंदवला. अधिक तपास उपनिरीक्षक व्ही.बी. गायकवाड करीत आहेत. दरम्यान, मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे, तसेच फरार आरोपीच्या शोधासाठी एक पथक तैनात केले आहे.

Web Title: Disgrace the relationship! In-law mama raped minor niece three times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.