दिशा ग्रुप प्रस्तुत ‘लोकमत स्वरचैतन्य’ची उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:59 AM2017-10-16T00:59:21+5:302017-10-16T00:59:21+5:30
दिवाळी पहाटची स्वरमयी परंपरा कायम राखत दिशा ग्रुप प्रस्तुत ‘लोकमत स्वरचैतन्य’ या सांगीतिक मैफलीचे २० आॅक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पाडव्याच्या मंगलमयी वातावरणात गूढ काव्य, अप्रतीम संगीत आणि स्वरस्वर्ग अशा गायकीचा ‘न भूतो, न भविष्यती’ अनुभव घेण्याची संधी यंदाच्या पाडव्याला उपलब्ध झाली आहे. दिवाळी पहाटची स्वरमयी परंपरा कायम राखत दिशा ग्रुप प्रस्तुत ‘लोकमत स्वरचैतन्य’ या सांगीतिक मैफलीचे २० आॅक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले
आहे.
पहाटेच्या हुडहुडी भरविणा-या थंडीत लोकमत भवनच्या हिरवळीवर शुक्रवारी सकाळी ६ वाजता सुरांची आतषबाजी सुरू होणार आहे. प्रख्यात अभिनेते व कवी मकरंद देशपांडे, ख्यातनाम गायक पं. अजय पोहनकर आणि तरुणाईचे ‘फेव्हरेट’ अभिजित पोहनकर यांच्या मैफलीत बुजुर्ग गायकी आणि तरुणांचा संगीत वाद्याविष्काराचा अनोखा साक्षात्कार या दिवाळी पहाटमध्ये अनुभवयाला मिळणार आहे.
मकरंद देशपांडे यांच्या नव्या युगातील कवितांचे अभिवाचन, पं. पोहनकर यांचा स्वरसाजाने नटलेली, सजलेली, फुललेली गजल व पारंपरिक ठुमरीचे सादरीकरण आणि कीबोर्ड, गिटार, बासरी व तबल्याचे वादन, अशा जुगलबंदीचे साक्षीदार होण्याची संधी उपलब्ध झाली
आहे.
‘दिशा गु्रप’ या कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक आहेत. सहप्रायोजकाची भूमिका ‘भाग्यविजय’ आणि ‘लिटिल एंजल्स इंग्लिश स्कूल’ यांनी घेतली असून, डेकोरेशन पार्टनर ‘एमडी महावीर’ तर हॉस्पिटॅलिटी पार्टनर ‘अगत्य केटरर्स’ आहेत.
कसा असेल प्रवेश?
कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आजच आपली मोफत सन्मानिका (पास) राखून ठेवा. एका सन्मानिकेवर एकाकुटुंबातील सदस्यांना प्रवेश दिला जाईल. तसेच ‘सखी मंच’ व ‘प्रिव्हिलेज मंच’ सदस्य ओळखपत्र दाखवून प्रवेश मिळवू शकतात. कार्यक्रमाला दर्दी रसिकांची गर्दी उसळणार हे नक्की.
‘प्रथम आगमनास प्रथम प्राधान्य’ देण्यात येणार असल्यामुळे कार्यक्रमाच्या १५ मिनिटे आधी येऊनच जागा निश्चित करावी. सुराच्या मेजवानीसह रसिकांना दिवाळी फराळाचाही आस्वाद घेता येणार आहे.