कामावरून काढून टाकल्याने केली कंपनीत चोरी
By | Published: November 26, 2020 04:13 AM2020-11-26T04:13:05+5:302020-11-26T04:13:05+5:30
वाळूज उद्योगनगरीतील संजीव ऑटो (प्लॉट नंबर सी-०७) या कंपनीतून ६ लाखांचे टूल्स चोरट्याने लांबविले होते. याप्रकरणी चोरीचा गुन्हा ...
वाळूज उद्योगनगरीतील संजीव ऑटो (प्लॉट नंबर सी-०७) या कंपनीतून ६ लाखांचे टूल्स चोरट्याने लांबविले होते. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी तपासाची सूत्रे फिरवीत कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने चोरट्याचा शोध सुरू केला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला संशयित चोरटा रांजणगाव शेणपुंजी येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळताच सोमवारी पोलीस पथकाने रांजणगावात संशयित आरोपीच्या घरी छापा मारला. यावेळी पोलीस पथक सतीश खोसे यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन आले. सतीशने कंपनीत चोरी केल्याची कबुली दिली. चोरीच्या दोन दिवस अगोदर सतीशला कामावरून काढून टाकले होते. त्यामुळे त्याने कंपनीत चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले.