थकबाकीपोटी ७१२ ग्राहकांचा पुरवठा खंडित
By Admin | Published: May 14, 2017 11:43 PM2017-05-14T23:43:30+5:302017-05-14T23:47:15+5:30
जालना : महावितरणने जालना जिल्ह्यात थकबाकीदार वीज ग्राहकांविरोधात महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहिम अधिक तीव्र केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महावितरणने जालना जिल्ह्यात थकबाकीदार वीज ग्राहकांविरोधात महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहिम अधिक तीव्र केली आहे.
जालना जिल्ह्यात वीज बिले न भरणाऱ्या ७१२ ग्राहकांचा ६१ लाख ९९ हजार रूपयांच्या थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित केला. तर २४८ ग्राहकांकडून ३ लाख ८५ हजार रूपयांची वीज बिलापोटी वसुली करण्यात आली. जिल्हयातील सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या २२१ वीज जोडण्या २ कोटी ९७ लाख रुपय थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित केला. तर ६ पाणी पुरवठा योजनेकडून ३८ हजार रुपये वीज बिलापोटी वसूल करण्यात आले. वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेवूनच विजेचा वापर करावा. वीज ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीज बिले भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. दरम्यान, शहरात बिल वाटपाचा घोळ कायम आहे. एप्रिल महिन्याचे बिल १५ तारीख उलटली तरी ग्राहकांना मिळालेले नाही. बिल वेळेत देण्याची मागणी ग्राहकांतून होत आहे.