एक्स सेक्टरमधील कचऱ्याची विल्हेवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:03 AM2021-01-10T04:03:56+5:302021-01-10T04:03:56+5:30
:लोकमत इफेक्ट; एक्स सेक्टरमधील कचºयाची विल्हेवाट लोकमत इफेक्ट : वाळूज उद्योगनगरीत स्वच्छता अभियान वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत साचले ...
:लोकमत इफेक्ट; एक्स सेक्टरमधील कचºयाची विल्हेवाट
लोकमत इफेक्ट : वाळूज उद्योगनगरीत स्वच्छता अभियान
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत साचले कचऱ्याचे ढीग या आशयाचे वृत्त शनिवारी (दि.९) लोकमतने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत एमआयडीसी प्रशासनाने कचरा संकलन करणाऱ्या कंपनीला खडे बोल सुनावताच महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने या सेक्टरमध्ये परिसर स्वच्छ केला.
एमआयडीसी वाळूज परिसरातील एक्स सेंटरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात केरकचरा साचला आहे. या परिसरातील हॉटेल, भाजीपाला विक्रेते आदींसह विविध व्यावसायिक या मोकळ्या भूखंडावर हॉटेलमधील शिळे अन्नपदार्थ, टाकाऊ भाजीपाला व केरकचरा आणून टाकत असल्याने या परिसरात कचऱ्याचे ढीग साचले आहे. उद्योगनगरीत कचरा संकलनाचे काम करणाऱ्या महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीकडून या सेक्टरमधील कचऱ्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याची ओरड या भागातील व्यवसायिकांनी केली होती. या भागात नियमितपणे केरकचरा उचलला जात नसल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याने व्यावसायिक व रस्त्याने ये-जा करणाऱ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे मोकाट जनावरे, कुत्री आदींचा या परिसरात मुक्त संचार वाढला आहे. संबंधित कंपनीकडून या सेक्टरमध्ये स्वच्छता केली जात नसल्याची ओरड व्यावसायिकांतून सतत केली जाते.
एक्स सेक्टरमध्ये स्वच्छता अभियान
या सेक्टरमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे वृत्त लोकमतने शनिवारच्या अंकात सविस्तर प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांनी कचरा संकलन करणाऱ्या महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या अधिकाऱ्याची कानउघडणी करीत त्वरित स्वच्छता करण्याचे आदेश बजावले होते. त्यामुळे कंपनीकडून या सेक्टरमध्ये स्वच्छता अभियान राबविल्याने या परिसरातील व्यवसायिकांनी लोकमतचे आभार मानले.
फोटो ओळ
वाळूज एमआयडीसीतील एक्स सेक्टरमध्ये महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीकडून स्वच्छता अभियान राबूवन परिसर स्वच्छ करण्यात आला.