हद्दीच्या कारणावरुन वीस तास मृतदेह पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:22 AM2017-09-24T00:22:09+5:302017-09-24T00:22:09+5:30
रेल्वे कर्मचारी वसाहत परिसरात ४० वर्षीय तरुणाचा मृतदेह शुक्रवारी आढळून आला. परंतु हद्दीच्या वादातून हा मृतदेह तब्बल २० तास तेथेच पडून होता.
जालना : येथील रेल्वे कर्मचारी वसाहत परिसरात ४० वर्षीय तरुणाचा मृतदेह शुक्रवारी आढळून आला. परंतु हद्दीच्या वादातून हा मृतदेह तब्बल २० तास तेथेच पडून होता. अखेर कदीम जालना पोलिसांनी वैद्यकीय अधिकाºयांच्या मदतीने हा मृतदेह शासकीय रुग्णालयात नेला. तेथे शवविच्छेदन करण्यात आले.
जालना स्थानकापासून परभणीकडे जाणाºया दिशेला काही अंतरावर झुडपांमध्ये एक कुजलेले मृतदेह शुक्रवारी तपोवन एक्स्प्रेसच्या गार्डला आढळून आला. त्याने स्थानक प्रमुखांना याची माहिती दिली. स्थानक प्रमुखांनी लोहमार्ग पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी कालच घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि सदर मृतदेह आपल्या हद्दीत नसल्याने स्टेशन मास्तरांना कल्पना दिली. त्यानंतर कदीम जालना पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती दिल्यानंतर कदिमचे उपनिरीक्षक शेळके, मोहिते हे रूग्णवाहिकेसह घटनास्थळी आले. परंतू हे प्रेत आपल्या हद्दीत नसल्याचे सांगत ते परत गेल्याचे लोहमार्ग पोलिस आणि रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले. ही बाब जालना दौºयावर असलेले गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पोलिसांनी सारवासारव करीत मृतदेहाचे शवविच्छेदन आणि पुढील कार्यवाही केली.
.........................................
२० तास पडून होते मृतदेह
पोलिसांच्या हद्दीच्या वादात हे मृतदेह तब्बल २० तास एकाच ठिकाणी पडून होते. परिसरात दुर्गंधीही पसरली होती. शुक्रवारी कदिमचे पोलिस येऊनही गेले होते. परंतू आपली हद्द नसल्याने ते परत गेले. शनिवारी पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी मृतदेह कुजल्याने हलविताही येत नसल्याचे कारण सांगितले. या दोन्हीच्या वादात मात्र, मृतदेहाची हेळसांड झाली असून, या अनोळखी इसमाची ओळख आता कशी पटणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
---------