वडिलांच्या पेंशनवरून वाद पेटला; लहान भावाच्या ॲसिड हल्ल्यात मोठ्याने एक डोळा गमावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 02:05 PM2021-02-23T14:05:59+5:302021-02-23T14:08:37+5:30

Acid Attack रविवारी रात्री १० च्या सुमारास फोन आल्याने मोठा भाऊ वडिलांना भेटायला लहान भावाच्या घरी गेला होता.

Dispute erupted over father's pension; Elder brothr lost an eye in the younger brother's acid attack | वडिलांच्या पेंशनवरून वाद पेटला; लहान भावाच्या ॲसिड हल्ल्यात मोठ्याने एक डोळा गमावला

वडिलांच्या पेंशनवरून वाद पेटला; लहान भावाच्या ॲसिड हल्ल्यात मोठ्याने एक डोळा गमावला

googlenewsNext
ठळक मुद्दे निवृत्त प्राध्यापक वडिलांना दरमहा ७० हजार रुपये पेंशन मिळते. वडील मोठ्या मुलास १० हजार रुपये देत असल्याने केला हल्ला

औरंगाबाद : निवृत्त प्राध्यापक वडील पेंशनमधून दरमहा मोठ्या भावाला दहा हजार रुपये खर्चाला देत असल्याचा राग मनात धरून लहान भावाने मोठ्या भावावर ॲसिडहल्ला करून गंभीर जखमी केले. या घटनेत त्याचा एक डोळा निकामी झाला असून, याविषयी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारदार रिजवान फकीर मोहम्मद पठाण (३९, रा. मिटमिटा) हे संगणक दुरुस्तीचा व्यवसाय करतात. त्यांच्या निवृत्त प्राध्यापक वडिलांना दरमहा ७० हजार रुपये पेंशन मिळते. त्यांचे वडील व लहान भाऊ शादाब कॉलनीत मुज्जमिलसह राहतात. चार महिन्यांपासून तक्रारदार यांना त्यांचे वडील खर्चासाठी दहा हजार रुपये देतात. ही रक्कम देण्यास मुज्जमिलचा विरोध आहे. 

रविवारी रात्री १० च्या सुमारास तक्रारदार यांना फोन आल्याने ते वडिलांना भेटायला लहान भावाच्या घरी गेले. त्यावेळी तेथे त्यांच्या भावाचा सासरा निसार शेख, साला बिलाल शेख आणि वडिलांचा मानसपुत्र युसूफ शेख होते. तक्रारदार हे घरी जाताच मुज्जमिलची सासू, बायको हे तक्रारदार यांना शिवीगाळ करू लागले. याचवेळी मुज्जमिल प्लास्टिक मगमधून ॲसिड घेऊन आला आणि त्याने हे ॲसिड रिजवानच्या तोंडावर फेकले. यामुळे रिजवान मोठमोठ्याने आरडू लागला. कुणी तरी या घटनेची माहिती छावणी पोलिसांना कळविली. पोलिसांनी येऊन त्यांना घाटीत दाखल केले. याप्रकरणी रिजवान यांच्या तक्रारीवरून छावणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

Web Title: Dispute erupted over father's pension; Elder brothr lost an eye in the younger brother's acid attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.