शुल्क भरण्याचा वाद; 'मनसे'कडून द जैन इंटनॅशनल स्कुलमध्ये मुख्याध्यापकांच्या दालनाची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 12:20 PM2020-10-16T12:20:47+5:302020-10-16T12:24:24+5:30
मेस्टा, मेसा संघटनांकडून आरोपींना अटक व शासन करण्याची मागणी
औरंगाबाद : शुल्क भरले नाही म्हणून ऑनलाईन लिंक न देण्यावरुन चर्चेत आलेल्या शहानुरमिया दर्गा परिसरातील द जैन इंटनॅशनल स्कुलमध्ये प्राचार्यांच्या दालनाची गुरुवारी दुपारी दिडच्या सुमारास घोषणाबाजी करत मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या प्रकरणी शाळा प्रशासनाने सातारा पोलीसांत तक्रार दिल्याची माहीती मुख्याध्यापक संतोष कुमार यांनी दिली.
संतोष कुमार म्हणाले, शाळा व पालकांचा विषय दोघेही आपसात मिटवतील. मात्र, शाळेत पाल्य नसतांना पालक म्हणून प्रवेशासाठी भेटीला आलेल्या दोन कार्यकर्त्यांना कार्यालयात घोषणाबाजी करत कार्यालयाची तोडफोड केली. त्यावेळी एक त्यांच्या सोबतचा व्यक्ती मोबाईलमध्ये शुटींग करत होता. ते घोषणाबाजी करुन बाहेर पडत नाही तोच इलेक्ट्राॅनीक मिडीयाही पोहचला. यावरुन हा प्लॅन करुन तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकारामुळे मी प्रचंड घाबरलो असून शाळेत माझ्याच दालनात असे हल्ल्याचे प्रकार घडत असतील तर विद्यार्थी पाठवायला पालकही घाबरतील. पालक मला वारंवार फोन करुन धिर देत असून इतर संस्थाचालकही या घटनेचा निषेध करत आहेत. सध्या सातारा पोलीसांत आलो असुन तक्रार दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. अचानक येवून ही तोडफोड करण्यात आली. या प्रकारामुळे शाळेतील शिक्षकांमध्ये भितीचे वातावरण असल्याचे येथील महिला शिक्षकांनी सांगितले. तर शाळेचा ऑनलाइन क्लास शुक्रवारी बंद राहिल अशी माहिती शाळा प्रशासनाने दिली.
घटनेचा व्हिडीओ व्हायरल
शाळा ऑनलाइन शिक्षणाचे शुल्क सक्तीने वसुल करत आहे. जे विद्यार्थी फीस भरत नाहीत त्यांना ऑनलाइन अभ्याससाठीच्या तासिकेची दिलेली लिंक बंद करण्यात आल्याचा आरोप करत ही तोडफोड करण्यात आल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओवरुन दिसते. जैन इंटनॅशनल स्कुल मध्ये दुपारी दिडच्या सुमारास अॅडमिशनचे काम सांगून दोघे जण मुख्याध्यापकांच्या दालनात पोहचले. त्यांनी सुरुवातीला साहित्य खरेदी, शुल्क आकारणीची चर्चा केली. नंतर अचानक एक फोन येतो. त्यानंतर फोन ठेवल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, राज साहेबांचा विषय असो अशा घोषणा देत खुर्ची, टेबलावरील काच उचलून तोडफोड केली. त्यानंतर खिडकीची काच फोडून घोषणाबाजी करत तोडफोड करणारे निघून गेले.
निषेधासाठी ऑनलाईन शिक्षण शुक्रवारी बंद
इंग्रजी शाळांच्या संघटना मेसाचे प्रल्हाद शिंदे यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला असुन या वर्षात हा पाचवा हल्ला आहे. मेसाकडून शुक्रवारी ऑनलाईन शिक्षण बंदची हाक शाळांना दिली गेली आहे. तर मेस्टाचे संजय तायडेपाटील यांनीही हल्लेखोरांना अटक व शासन होईपर्यंत आॅनलाईन शिक्षण सुरु करणार नसल्याचे सांगितले.
शेडमध्ये झोपेलेल्या चिमुकलीचे मध्यरात्री अपहरण
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) October 16, 2020
https://t.co/Rmi8ACmCeD