लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये वाद; प्रेयसी आणि तिच्या मित्राची प्रियकराला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 02:27 PM2021-03-24T14:27:01+5:302021-03-24T14:29:52+5:30

यावेळी अहेमद आणि प्रेयसीने त्यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली.

Disputes in live-in relationships; Beating the sweetheart and one of her friends | लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये वाद; प्रेयसी आणि तिच्या मित्राची प्रियकराला मारहाण

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये वाद; प्रेयसी आणि तिच्या मित्राची प्रियकराला मारहाण

googlenewsNext

औरंगाबाद : सतरा वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या महिलेला कॉल का करतो, असे विचारण्यास गेलेल्या व्यक्तिला प्रेयसी आणि तिच्या मित्राने मारहाण केल्याची घटना कांचनवाडी येथे २१ मार्च रोजी दुपारी घडली. याविषयी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

तक्रारदार हे मागील काही वर्षांपासून त्यांच्या प्रेयसीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रेयसीच्या मोबाईलवर आरोपी अहेमद सय्यद (३०) हा रात्री अपरात्री फोन करीत असतो. ही बाब तक्रारदारास समजल्यामुळे त्याचे त्याच्या प्रेयसीसोबत भांडण झाले. यानंतर ते अहेमदला जाब विचारण्यासाठी गेले तेव्हा तेथे त्यांची प्रेयसी आली. यावेळी अहेमद आणि प्रेयसीने त्यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. यावेळी आरोपी अहेमदने त्यांच्या छातीवर चाकू मारण्यासाठी उगारला असता तक्रारदार यांनी प्रसंगावधान राखून तो वार दंडावर झेलला. यामुळे त्यांना दुखापत झाली. या घटनेनंतर तक्रारदाराने अहेमद आणि महिलेविरुध्द सातारा ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
 

Web Title: Disputes in live-in relationships; Beating the sweetheart and one of her friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.