निषेधामुळे रुग्णसेवा विस्कळीत

By Admin | Published: March 20, 2017 10:38 PM2017-03-20T22:38:00+5:302017-03-20T22:41:13+5:30

अंबाजोगाई : राज्यभरात डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी अंबाजोगाई येथे मार्डच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.

Disrupted patient services due to prohibition | निषेधामुळे रुग्णसेवा विस्कळीत

निषेधामुळे रुग्णसेवा विस्कळीत

googlenewsNext

अंबाजोगाई : राज्यभरात डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी अंबाजोगाई येथे महाराष्ट्र असोसिएशन आॅफ निवासी डॉक्टर (मार्ड)च्या वतीने अंबाजोगाई, धारूर येथे निषेध व्यक्त करण्यात आला. या निषेधात अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयातील ८० डॉक्टरांचा समावेश होता. यावेळी ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना उपचारासाठी ताटकळावे लागले.
यावेळी डॉक्टर संघटनेच्या वतीने अधिष्ठाता सुधीर देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात सातत्याने डॉक्टरांना हल्ले होत आहेत. या प्रकारामुळे शासकीय रुग्णालयातील डॉक्टर असुरक्षित आहेत. हे हल्ले रोखण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी निवासी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. विनय नाळपे यांनी केली आहे.
निषेधादरम्यान अंबाजोगाई स्वाराती रुग्णालयातील रुग्णसेवा विस्कळीत झाली होती. निवासी डॉक्टर संघटनेच्या मागण्यांची दखल घ्यावी यासाठी मंगळवारी कँडल मार्च काढण्यात येणार असल्याचेही डॉ. नाळपे यांनी सांगितले.
डॉक्टरांच्या सामूहिक रजेमुळे ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना खासगी रुगण्यांलयाचा आधार घ्यावा लागला असल्याचे चित्र अंबाजोगाईत पहावयास मिळाले. (वार्ताहर)

Web Title: Disrupted patient services due to prohibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.