तीसगावात खंडित वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:06 AM2021-03-04T04:06:30+5:302021-03-04T04:06:30+5:30

--------------------------------------------- वडगावात उघड्यावर केरकचरा वाळूज महानगर : वडगावातील सलामपुरेनगर, भविष्यदीपनगर या वसाहतींमध्ये उघड्यावर केरकचरा टाकला जात असल्याने सर्वत्र दुर्गंधी ...

Disrupted power supply in Teesgaon | तीसगावात खंडित वीजपुरवठा

तीसगावात खंडित वीजपुरवठा

googlenewsNext

---------------------------------------------

वडगावात उघड्यावर केरकचरा

वाळूज महानगर : वडगावातील सलामपुरेनगर, भविष्यदीपनगर या वसाहतींमध्ये उघड्यावर केरकचरा टाकला जात असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. या भागातील बहुतांश नागरिक कचरा कुंडीत न टाकता उघड्यावर टाकत असतात. या कचऱ्यामुळे वसाहतींमध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांचा वावर वाढला आहे. ग्रामपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी नियमितपणे साफसफाई करीत नसल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.

--------------------------------------------

पंढरपूरला अतिक्रमणांचा विळखा

वाळूज महानगर : पंढरपुरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा विविध व्यावसायिकांनी अतिक्रमणे थाटून व्यवसाय सुरू केला आहे. या अतिक्रमणांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून, किरकोळ अपघातही घडत आहेत. स्थानिक ग्रामपंचायत अतिक्रमणावर कारवाई करण्यास दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नागरिकांत असंतोष दाटतो आहे. या व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

-------------------------------

जोगेश्वरीत दारू विक्रेत्यास पकडले

वाळूज महानगर : जोगेश्वरीत अवैधरीत्या देशी दारूची विक्री करणाऱ्या एकास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी मंगळवारी (दि.२) छापा मारून पकडले. येथील झोपडपट्टीत रामेश्वर गवई हा देशी दारूची विक्री करताना पोलिसांना मिळून आला. आरोपीच्या ताब्यातून ९३६ रुपये किमतीच्या दारूच्या १८ बाटल्या जप्त करण्यात आल्या.

------------------------------------------------

खोडसाळपणे आग लावणाऱ्यावर कारवाई करा

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील उद्यानाला खोडसाळपणे आग लावणाऱ्या माथेफिरुविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे. गत पंधरवड्यात या उद्यानात तिसऱ्यांदा आग लागून शेकडो झाडे होरपळली आहेत. कुणीतरी खोडसाळपणे उद्यानाला आग लावत असल्याचा संशय नागरिकांनी वर्तविला आहे. समाजकंटकावर कारवाई करण्याची मागणी एस.डी. खोसेल, संदीप तरटे, गणेश बिरादार, भगवान आवसरमल आदींनी सिडको प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

-------------------

Web Title: Disrupted power supply in Teesgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.