बदनापूर तालुक्यात पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:27 AM2018-03-10T00:27:08+5:302018-03-10T00:27:13+5:30
तालुक्यातील अनेक गावच्या पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा महावितरणने बंद केला आहे. चार-पाच महिन्यांपासून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने सरपंच संघटनेने हंडा मोर्चा काढण्याचा इशारा जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : तालुक्यातील अनेक गावच्या पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा महावितरणने बंद केला आहे. चार-पाच महिन्यांपासून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने सरपंच संघटनेने हंडा मोर्चा काढण्याचा इशारा जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, विज वितरणने आडमुठी भुमिका स्विकारून तालुक्यातील सार्वजनिक पाणीपुरवठयाचे कनेक्शन गेल्या चार पाच महिन्यांपासून नियमबाह्यरित्या बंद केले आहेत़ या संघटनेचे अध्यक्ष राम पाटील यांनी १५ फेब्रुवारीला माहिती अधिकाराखाली लेखी जाब विचारला असता महावितरण खडबडून जागे होऊन सर्व ग्रामपंचायतींना लेखी नोटीस देवून मागील २० ते २५ वर्षांपासूनची थकीत बिले एकदाच भरण्याचा आग्रह करत आहेत़ मागील २० वर्षांपासून एकदाही ग्राम पंचायतीला नोटीस बजावलेली नाही किंवा वीज पुरवठा खंडीत केला नाही़ त्यामुळे १ ते २० लाखांपर्यंत वीज बिल थक लेली आहेत. एकही ग्रा.पं.ला विद्युत मिटर बसविलेले नाही. मागील चार पाच वर्ष दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यात विहीर अधिग्रहण किंवा टँकरद्वारे पाणी पुरवठा केला गेला. त्याही काळातले विज बिल आकारले यापूर्वी एकदाही लेखी नोटीस दिली नाही किंवा विज पुरवठा खंडीत केला नाही त्यामुळे मागील थकीत बिले एकदम भरू शकत नाही. तालुक्यातील चार-पाच ग्राप वगळता अन्य ग्रापला उत्पन्नाचे साधन नाही. चालु बिले स्विकारून वीज कनेक्शन ८ दिवसांत सुरळीत करण्याचे आदेश द्यावे नसता महिलांचा हंडा मोर्चा काढुन रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून जिल्हाधिकाºयांना दिला आहे. या निवेदनावर राम पाटील, प्रकाश कदम, इंदुमती गिते, दिपीका मोरे, नंदा मिसाळ, अंकुश ओळेकर, कडोस यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांच स्वाक्षºया आहेत़