वाळूज परिसरात शेतकऱ्यांनी मांडल्या दुष्काळाच्या व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 09:33 PM2018-11-12T21:33:07+5:302018-11-12T21:33:33+5:30
वाळूज महानगर: वाळूज परिसरात सोमवारी भाजपा पदाधिकाºयांनी विविध ठिकाणी भेटी देऊन दुष्काळग्रस्त शेतकºयांशी संवाद साधला. या प्रसंगी शेतकºयांनी पदाधिकाºयासमोर दुष्काळाच्या व्यथा मांडत मदतीसाठी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्याची विनंती केली.
वाळूज महानगर: वाळूज परिसरात सोमवारी भाजपा पदाधिकाºयांनी विविध ठिकाणी भेटी देऊन दुष्काळग्रस्त शेतकºयांशी संवाद साधला. या प्रसंगी शेतकºयांनी पदाधिकाºयासमोर दुष्काळाच्या व्यथा मांडत मदतीसाठी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्याची विनंती केली.
वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, गंगापूर पंचायत समितीच्या सभापती ज्योती गायकवाड, जि.प.सदस्य रामदास परोडकर, अविनाश गायकवाड, नंदकुमार गांधिले, कृषी विभागाचे अशोक बनगे, सुनील वझे, अशोक म्हस्के, दादासाहेब टेमकर, प्रवित मांडे आदींच्या पथकाने वाळूज परिसरातील वाळूज, शिवराई, लिंबेजळगाव, रहिमपूर, अब्दुलपुर, पिंपरखेडा आदी ठिकाणी भेटी देऊन शेतकºयांशी संवाद साधला.
यावेळी अशोक जाधव, भाऊसाहेब कुंजर,दशरथ साबळे, हाशम शेख, रणजीत दिलवाल आदी शेतकºयांनी आपल्या व्यथा मांडल्या. या परिसरात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील कापूस, बाजरी, तूर, मका आदी पिके हातची गेली असून, जेमतेम उत्पादन झाल्याचे सांगितले. विहिरीच्या पाणी पातळीतही झपाट्याने घट होत असून, पिण्याच्या पाण्याचा तसेच चाºयाचा प्रश्न गंभीर बनल्याचे सांगितले.
शिवराई येथील हनुमान मंदिरात शेतकºयांची बैठक घेण्यात आली. बैठकीत पाणी टंचाई, चारा छावण्या तात्काळ सुरु करणे, सिडको वाळूजमहानगर-३ चा प्रकल्प विकसीत करण्याची मागणी शेतकºयांनी लावून धरली. पाणीटंचाई, चारा छावण्या उभारणे, शेतकºयांना पिक विम्याचा लाभ देणे, रोहयो अंतर्गत जलसंधारणाची कामे सुरु करणे आदी कामांचे नियोजन केले जात असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले. यावेळी रामेश्वर मालुसरे, सुरेश राऊत, बाबासाहेब शिंदे, काशीनाथ आरगडे, शंकर पारधे, गंगाराम हिवाळे, ज्ञानेश्वर गवळी, काकासाहेब चापे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.