रांजणगावात आषाढीनिमित्त ११०० तुळशीचे रोप वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:04 AM2021-07-21T04:04:27+5:302021-07-21T04:04:27+5:30
भाविकांना आरोग्यवर्धक गुणी तुळशीचे रोप वाटप करण्यासाठी पंचायत समिती सदस्य दीपक बडे यांनी पुढाकार घेतला होता. ‘जरी यंदा नाही ...
भाविकांना आरोग्यवर्धक गुणी तुळशीचे रोप वाटप करण्यासाठी पंचायत समिती सदस्य दीपक बडे यांनी पुढाकार घेतला होता. ‘जरी यंदा नाही आषाढी वारी, विठ्ठल रूपी तुळस घरोघरी’ हा उपक्रम राबवण्यात आला. या प्रसंगी गटविकास अधिकारी विजय परदेशी, पंचायत समिती सदस्य दीपक बडे, सुनील केरे, गणेश हिवाळे, सोमनाथ नमाणे, बबन पठाडे, माजी सरपंच योगेश दळवी, कृष्णा लिमकर, अजित बडे, समाधान बडे, दत्ता ढाकणे, मनोज सोनवणे, प्रवीण निकाळजे, आजीनाथ घुगे, शैलेश कारखेले, पवन घुगे आदींची उपस्थिती होती.
फोटो ओळ- रांजणगावात आषाढीनिमित्त विठ्ठलभक्त व नागरिकांना तुळशीच्या झाडांचे रोप वाटप करताना पंचायत समिती सदस्य दीपक बडे, गटविकास अधिकारी विजय परदेशी, सुनील केरे आदी.
------------------------
बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू
वाळूज महानगर : घरी बेशुद्ध पडलेल्या सुनील दादाजी सावंत (३५ रा. सिडको वाळूज महानगर) यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास अचानक बेशुद्ध पडले होते. विकेश सावंत व भगवान तेजाड यांनी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले.
---------------------
वाळूज महानगरातून दोन दुचाकी लंपास
वाळूज महानगर : वाळूज महानगरातून चोरट्यांनी दोन दुचाकी लंपास केल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली. रवींद्र साहेबराव व्यवहारे (रा. वडगाव) यांची दुचाकी (एम.एच.२०, ई.टी. ४४१५) घरासमोरून चोरट्याने पळवली. दुसऱ्या घटनेत सूरज शिवाजी डघळे (रा. रांजणगाव) यांची दुचाकी (एम.एच.२०,डी.एल.९६०) सिमेन्स कंपनीसमोरून चोरी झाली.
------------------
शहीद भगतसिंह विद्यालयात गुणवंताचा सत्कार
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील शहीद भगतसिंह विद्यालयात दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मुख्याध्यापिका भारती साळुंके, शालेय व्यवस्थापन समितीच्या माजी अध्यक्षा मंगल अभंग आदींच्या उपस्थितीत तेजस अभंग, कल्याणी शेटे, पायल राऊत आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
---------------------
जोगेश्वरीत खंडित वीज पुरवठा
वाळूज महानगर : जोगेश्वरीत सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहे. रात्रभर वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिक व लहान मुलांना त्रास सहन करावा लागला. महावितरणकडून सुरळीत वीज पुरवठा केला जात नसल्याने वीज ग्राहकात असंतोषाचे वातावरण आहे.
----------------------