पैठणच्या दिव्यांग बांधवांना अंत्योदय कार्डचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:05 AM2021-03-09T04:05:01+5:302021-03-09T04:05:01+5:30
तहसील कार्यालयाच्यावतीने सोमवारी दिव्यांगांना अंत्योदय रेशन कार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार दत्ता निलावाड, प्रहार संघटनेचे ...
तहसील कार्यालयाच्यावतीने सोमवारी दिव्यांगांना अंत्योदय रेशन कार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार दत्ता निलावाड, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाढे,
पुरवठा विभागाचे नितीन जाधव, प्रदीप गायके, बालाजी कांबळे, नीलेश निवारे, सोमनाथ ढगे यांची उपस्थिती होती. यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून तहसीलदार शेळके यांनी दिव्यांग महिला भगिनींचा सत्कार केला. दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. असे त्यांनी सांगितले. प्रहार संघटनेच्या पाठपुराव्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात प्रथमच पैठण तहसील कार्यालयाने दिव्यांगांना अंत्योदय कार्ड वाटप केल्याचे नायब तहसीलदार दत्तात्रेय निलावाड यांनी सांगितले. याप्रसंगी बाबासाहेब पठाडे, धोंडीराम सकुंडे, सुनीता खरात,भागचंद ससाने, संजय शिंदे,राजू पिंजारी, बाबासाहेब शिपणकर, दीपक वैष्णव, राधा खरात, गणेश भवरे, महेंद्र नरके यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पा डांगे यांनी केले तर विष्णू सोनार यांनी आभार मानले.