नारायणपुरात दिव्यांगांना धनादेश वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:03 AM2021-06-03T04:03:57+5:302021-06-03T04:03:57+5:30
-------------------------- मनीषानगरात विजेचा लपंडाव वाळूज महानगर : वाळूजच्या मनीषानगरात विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांना विविध अडचणीचा सामना करावा ...
--------------------------
मनीषानगरात विजेचा लपंडाव
वाळूज महानगर : वाळूजच्या मनीषानगरात विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे. महावितरणकडून ग्राहकांना पूर्वसूचना न देता वीजपुरवठा तासन्तास खंडित केला जात असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे. वीजबिलाची महावितरणकडून सक्तीने वसुली केली जात असून वीजपुरवठा मात्र सुरळीत केला जात नसल्याने असंतोषाचे वातावरण आहे.
-----------------------------
ओयासीस चौकात सांडपाण्याचे डबके
वाळूज महानगर : पंढरपुरातील ओयासीस चौकात ठिकठिकाणी सांडपाण्याचे डबके साचल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. या चौकात रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे. या पाण्यामुळे वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका बळावला आहे.
---------------------------
मारहाण करणाऱ्या तिघांविरुध्द गुन्हा
वाळूज महानगर : जुन्या भांडणाच्या कारणावरून एकास बेदम मारहाण करणाऱ्या तिघांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागेश जगन्नाथ गायकवाड (३० रा.काचीपुरा, तीसगाव परिसर) यास ३० मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून नागेश पिंपळे, गणेश खुर्दे व एका महिलेने लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून जखमी केले होते. या मारहाण करणाऱ्या तिघांविरुध्द नागेश गायकवाड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------------------
जोगेश्वरीत अंतर्गत रस्त्याची दुरवस्था
वाळूज महानगर : जोगेश्वरीत अंतर्गत रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने वाहनधारक व नागरिकांना ये-जा करताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. गावात दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याचे तळे साचले आहे. कच्चे रस्ते असल्याने नागरिकांना चिखल व पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने किमान मुरुम टाकण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
-------------------------------