अंधारी सर्कलमध्ये किराणा कीट, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:04 AM2021-05-11T04:04:12+5:302021-05-11T04:04:12+5:30
शिवसेनेच्या वतीने कोरोना लॉकडाऊन काळात हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब गरजूंना किराणा कीट व जीवनावश्यक वस्तूंचे घरपोच वाटप सुरू आहे. ...
शिवसेनेच्या वतीने कोरोना लॉकडाऊन काळात हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब गरजूंना किराणा कीट व जीवनावश्यक वस्तूंचे घरपोच वाटप सुरू आहे. शुक्रवारी अंधारी सर्कलमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी माजी जि. प. उपाध्यक्ष केशवराव तायडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, कृउबाचे संचालक सुनील पाटणी, माजी उपसरपंच अब्दुल रहिम, राजू पाटणी, वाहेद पटेल, बाळू गोरे, पोपट तायडे, अण्णा पांडव, लक्ष्मण तायडे, भानुदास तायडे, विठ्ठल तायडे, फकीरा ड्रायव्हर, आदींची उपस्थिती होती. तालुक्यातील जवळपास ८० टक्के गावात गरजूंना मदत पोहोचविण्यात आली असून, उर्वरित गावांमध्ये येत्या तीन दिवसांत शिवसेनेची मदत पोहोचेल अशी माहिती अब्दुल समीर यांनी दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशीही संवाद साधला.
फोटो : अंधारी येथे युवा नेते अब्दुल समीर यांच्या हस्ते गरजूंना किराणा कीटचे वाटप करण्यात आले.
100521\img-20210509-wa0103_1.jpg
अंधारी येथे युवा नेते अब्दुल समीर यांच्या हस्ते गरजूंना किराणा किटचे वाटप करण्यात आले.