खरीप अनुदानाचे १0९ कोटी वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2016 11:30 PM2016-02-18T23:30:00+5:302016-02-18T23:43:33+5:30

हिंगोली : जिल्ह्यात खरीप अनुदानाचे वाटप यावर्षी मोठ्या गतीने करण्यात आले.

Distribution of Kharif grants is about 109 crores | खरीप अनुदानाचे १0९ कोटी वितरित

खरीप अनुदानाचे १0९ कोटी वितरित

googlenewsNext

हिंगोली : जिल्ह्यात खरीप अनुदानाचे वाटप यावर्षी मोठ्या गतीने करण्यात आले. सेनगाव वगळता इतर सर्व तालुक्यांत ९९ टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या याद्या बँकेकडे पोहोचल्या आहेत. काही तुरळक ठिकाणी खात्यावर रकमा जमा होणे तेवढे बाकी आहे. एकूण १0९ कोटी रुपयांचे वितरण झाले आहे.
हिंगोली जिल्ह्याला खरीप अनुदानापोटी पहिल्या टप्प्यात ११२.४५ कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत. एकूण २0१.१७ कोटी रुपये मंजूर आहेत. त्यापैकी १११.९0 कोटी रुपये बीडीएसवर उचलण्यात आले. यातून जिल्ह्यातील ७0७ पैकी ४७५ गावांतील शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप केले आहे.
मिळालेल्या रकमेतून १ लाख ५६ हजार ६२८ शेतकऱ्यांना अनुदान वाटप झाले आहे. तालुकानिहाय हिंगोली-१८७१८, कळमनुरी-३३१७८, सेनगाव-२७५३७, वसमत-४९१६७, औंढा-२८0२८ अशी शेतकरीसंख्या आहे. यामध्ये वाटप करण्यात आलेली खरीप अनुदानाची तालुकानिहाय रक्कम अशी हिंगोली-२३.८२ कोटी, कळमनुरी-२२.२३ कोटी, सेनगाव-२३.२३ कोटी, वसमत-२२.३७ कोटी, औंढा -१७.८९ कोटी रुपये असे वितरण झाले आहे.
यात सेनगाव तालुक्यात अजूनही २.१३ कोटी रुपयांचे वितरण बाकी आहे.या तालुक्यातील वाटपाला अजून दोन दिवस लागण्याची चिन्हे आहेत. या सर्व शेतकऱ्यांच्या याद्या, रकमा व खातेक्रमांक संबंधित बँकांना दिल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Distribution of Kharif grants is about 109 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.