‘लोकमत’ शिक्षण सेवा गौरव पुरस्कारांचे दिमाखात वितरण
By Admin | Published: September 10, 2015 12:08 AM2015-09-10T00:08:03+5:302015-09-10T00:33:38+5:30
बीड : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन आपला ठसा उमटविणाऱ्या संस्था, व्यक्तींचा ‘लोकमत’च्या वतीने बुधवारी शिक्षण सेवा गौरव-२०१५ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
बीड : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन आपला ठसा उमटविणाऱ्या संस्था, व्यक्तींचा ‘लोकमत’च्या वतीने बुधवारी शिक्षण सेवा गौरव-२०१५ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा थाटात पार पडला.
कार्यक्रमासाठी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी विकास सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी (प्रा.) शशिकांत हिंगोणेकर, ‘लोकमत’च उपाध्यक्ष संदीप बिष्णोई, संपादक सुधीर महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. इंग्लिश स्कूल, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस यासारख्या क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या संस्थांचा गौरव ‘लोकमत’ने केला.
जिल्ह्यातील अनेक संस्था चालक व प्राचार्य, शिक्षक, क्लासेसचे संचालक यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. बीड शहरातील अन्विता हॉटेलमध्ये हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
सन्मानचिन्ह देऊन गौरव
पुरस्कारप्राप्त संस्था, व्यक्तींना ‘लोकमत’च्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)