९ लाख ७८ हजार मतदान कार्डचे पोस्टाने मतदारांपर्यंत वाटप
By साहेबराव हिवराळे | Published: May 9, 2024 06:32 PM2024-05-09T18:32:35+5:302024-05-09T18:33:11+5:30
पोस्ट कर्मचाऱ्यांनी वाटपाची दाखविली तत्परता
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर विभाग, मराठवाडा अन् खानदेशात ९ लाख ७८ हजार ४२७ मतदान कार्ड नवीन आणि अपडेट केलेले पोस्टात जानेवारी ते एप्रिल महिन्यात बुक झाले. पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेसह ते वाटपही केलेले आहेत. अजूनही मतदान कार्डाचे बुकिंग सुरूच असल्याचे दिसत आहेत.
मतदान ओळखपत्र महत्त्वाचे मानले जाते. नव्याने मराठवाडा अन् खानदेशात ९ लाख ७८ हजार ४२७ मतदान कार्डचे बुकिंग पोस्टात झाले होते अन् त्याचे वाटपही झालेले आहे. या मतदान कार्डमध्ये ८० टक्के नवीन मतदारांचा समावेश आहे; तर इतरांंनी अपडेट करूनही घेतलेल्या कार्डांचाही समावेश असल्याचे समजते. मतदार यादीत तुमचे मतदान कोणत्या केंद्रावर आहे, त्यासाठी मतदारांच्या घरोघरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेले बेलीफ आपली सेवा बजावताना दिसत आहेत. पोस्टाकडे
बुकिंग आणि वाटप
जानेवारी - १४८७०३,
फेब्रुवारी - २९२३११,
मार्च - ३१०८२५,
एप्रिल - २२६५८८
एकूण - ९ लाख ७८ हजार ४२७
नवीन मतदार कार्ड बुकिंग सुरूच; मतदानापूर्वी वाटपाचा उद्देश
मतदान कार्ड निवडणुकीच्या पूर्वी ज्या त्या जिल्हा, तालुका गावपातळीवर पोहोच करण्यासाठी पोस्टाची यंत्रणा सज्ज असून, बुकिंग झालेले कार्ड जलद गतीने मतदारांकडे पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पोस्टल बॅलेट पेपरचेही बुकिंग होत आहे.
- असदउल्लाह शेख, सहायक निदेशक, डाक सेवा क्षेत्रीय कार्यालय