जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अनाथ प्रमाणपत्रांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:21 AM2020-12-11T04:21:41+5:302020-12-11T04:21:41+5:30

शनिवारी राष्ट्रीय लोकअदालत औरंगाबाद: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ...

Distribution of orphan certificates by the Collector | जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अनाथ प्रमाणपत्रांचे वाटप

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अनाथ प्रमाणपत्रांचे वाटप

googlenewsNext

शनिवारी राष्ट्रीय लोकअदालत

औरंगाबाद: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालयतर्फे १२ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा व सत्र न्यायालय व सर्व तालुकास्तरावरील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. मोटार अपघात, धनादेश अनादरीत प्रकरणे, वैवाहिक वाद, भूसंपादन, तडजोडयुक्त दिवाणी व फौजदारी प्रकरणे, पैसे वसुलीचे प्रकरणे, विद्युत प्रकरणे, लवाद प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणांमध्ये मोबाईल कंपन्यांची प्रकरणे आहेत. लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोड करण्याचे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीपाद टेकाळे यांनी केले आहे.

बारावीचे मूळ प्रमाणपत्रे आज होणार वितरित

औरंगाबाद: उच्च माध्यमिक मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेतलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षार्थींचे मूळ प्रमाणपत्र विभागीय मंडळास प्राप्त झाले आहेत. सदरील मूळ प्रमाणपत्रे नेहमीच्या वितरण केंद्रावर ११ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत वितरित करण्यात येत आहेत. तरी सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, उच्च माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालयांनी वेळेत ती स्वीकारावीत असे आवाहन विभागीय मंडळाने केले आहे.

Web Title: Distribution of orphan certificates by the Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.