एसटी कामगारांना गणवेश वाटप करून घेतले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:38 AM2018-01-07T00:38:31+5:302018-01-07T00:38:42+5:30

एसटी महामंडळातर्फे शनिवारी (दि.६)संवर्गनिहाय तयार करण्यात आलेल्या नव्या गणवेशांचे कर्मचाºयांना प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले; परंतु महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत गणवेश वाटपाचा केवळ सोपस्कार पार पाडण्यात आला. कार्यक्रम आटोपताच वाटप केलेले गणवेश कामगारांकडून परत घेण्यात आले. त्यामुळे कामगारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Distribution of uniforms to ST workers is done | एसटी कामगारांना गणवेश वाटप करून घेतले परत

एसटी कामगारांना गणवेश वाटप करून घेतले परत

googlenewsNext
ठळक मुद्देमध्यवर्ती कार्यशाळा : कामगारांना गणवेश वाटपाचा सोपस्कार

औरंगाबाद : एसटी महामंडळातर्फे शनिवारी (दि.६)संवर्गनिहाय तयार करण्यात आलेल्या नव्या गणवेशांचे कर्मचाºयांना प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले; परंतु महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत गणवेश वाटपाचा केवळ सोपस्कार पार पाडण्यात आला. कार्यक्रम आटोपताच वाटप केलेले गणवेश कामगारांकडून परत घेण्यात आले. त्यामुळे कामगारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
एसटी महामंडळाच्या कर्मचाºयांना दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नवीन गणवेश वाटपाला मुहूर्त मिळाला. महामंडळाच्या विभागीय कार्यालयासह चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत प्रातिनिधिक स्वरूपात गणवेश वाटपाचा कार्यक्रम शनिवारी घेण्यात आला. मध्यवर्ती कार्यशाळेत कामगारांना नव्या गणवेशाचे वाटप करण्यात आले; परंतु कार्यक्रम संपताच दिलेले गणवेश परत घेण्यात आले. हा प्रकार पाहून कामगारही थक्क झाले. तुमच्या साईजचे नाहीत, पुन्हा दिले जातील, असे म्हणत गणवेश जमा करून घेण्यात आले. या प्रकाराने कामगारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जर परत घ्यायचे होते तर दिले कशाला, असा सवाल कामगारांनी केला.
महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे अध्यक्ष शेख तालेब म्हणाले, तीन वर्षांपासून गणवेशाचा कपडा मिळालेला नाही. आज आमदारांच्या हस्ते कामगारांना गणवेश वाटप करून कार्यक्रमानंतर परत घेण्यात आले. केवळ कार्यक्रमाचा सोपस्कार पार पाडण्यात आला. याविषयी कार्यशाळेचे व्यवस्थापक यू. ए. काटे म्हणाले, गणवेश वाटप करण्यात आले; परंतु त्यांची नोंदणी करण्यासाठी ते परत घेण्यात आले आहेत. नोंदणी करून रविवारी सकाळी गणवेश कामगारांना परत दिले जातील.

विभागीय कार्यालयात सोहळा
विभागीय कार्यालयात आयोजित कार्यक्रमात १५ संवर्गाच्या ३९ कर्मचाºयांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, रमेश पवार, विभाग नियंत्रक आर. एन. पाटील, कार्यक ारी अभियंता कुलाल, वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी एम. डी. कें जळे, कर्मचारीवर्ग अधिकारी ए. एस. घोडके, कामगार अधिकारी एल. व्ही. गवारे, लेखा अधिकारी वंदना चितंल, नवनाथ बोडखे आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणवेशाचे वाटप करण्यात आले. उर्वरित कर्मचाºयांना गणवेश कधी मिळणार, असे म्हणत इतरांना मिळालेले गणवेश कर्मचारी न्याहाळत होते.

 

 

Web Title: Distribution of uniforms to ST workers is done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.