जिल्ह्यात पुन्हा विळखा घट्ट,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:02 AM2021-02-23T04:02:07+5:302021-02-23T04:02:07+5:30

तीन रुग्णांचा मृत्यू : ९२१ रुग्णांवर सुरू उपचार औरंगाबाद : जिल्ह्यात तब्बल ४ महिन्यांनंतर कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येने रविवारी दोनशेचा ...

In the district again, | जिल्ह्यात पुन्हा विळखा घट्ट,

जिल्ह्यात पुन्हा विळखा घट्ट,

googlenewsNext

तीन रुग्णांचा मृत्यू : ९२१ रुग्णांवर सुरू उपचार

औरंगाबाद : जिल्ह्यात तब्बल ४ महिन्यांनंतर कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येने रविवारी दोनशेचा आकडा पार केला. दिवसभरात तब्बल २०१ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ६४ जण कोरोनामुक्त झाले, तसेच उपचार सुरू असताना तिघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ९२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४८ हजार ६३८ झाली आहे, तर आतापर्यंत ४६ हजार ४६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,२५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या २०१ रुग्णांत मनपा हद्दीतील सर्वाधिक १८४, ग्रामीण भागातील १७ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ५८ आणि ग्रामीण भागातील ६, अशा एकूण ६४ रुग्णांना रविवारी सुटी देण्यात आली.

तर गंगापूर तालुक्यातील २५ वर्षीय पुरुष, रोकडा हनुमान कॉलनीतील ७० वर्षीय स्त्री, नांदर, पाचोड येथील ६५ वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

घाटी परिसर ३, चिकलठाणा १, टिळकनगर १, कांचनवाडी १, सन्म‍ित्र कॉलनी १, राधामोहन कॉलनी, खोकडपुरा १, नक्षत्रवाडी १, श्रेयनगर ४, खडकेश्वर १, उस्मानपुरा १, एन दोन सिडको १, पेशवेनगर, सातारा परिसर १, आलोकनगर १, शंभूनगर १, रामकृष्णनगर १, बीड बायपास ४, सावित्रीनगर १, सिंधी कॉलनी, मोंढा १, एन तीन सिडको १, त्रिमूर्तीनगर, देवळाई परिसर बीड बायपास १, सिंहगड कॉलनी, एम दोन १, एन पाच सिडको ४, एन दोन रामनगर १, मिलेनियम पार्क, चिकलठाणा २, पिसादेवी १, सुराणानगर १, वेदांतनगर १, रामनगर १, ठाकरेनगर १, लक्ष्मीनगर १, पारिजातनगर २, मायानगर १, ओम शांतीनगर १, जयभवानीनगर २, मुकुंदवाडी ३, प्रेरणानगर १, टाऊन सेंटर १, हनुमाननगर १, वाल्मी नाका, पैठण रोड १, श्रीराम कॉलनी, बन्सीलालनगर १, न्यू गुलमंडी रोड १, मयूर पार्क १, शिवाजीनगर १, एन वन सिडको १, सातारा परिसर १, जवाहर कॉलनी १, एन चार सिडको ३, छत्रपतीनगर १, गायकवाड क्लासेस परिसर १, क्लिक हॉस्टेल परिसर २, दिल्ली गेट परिसर २, कासलीवाल तारांगण, मिटमिटा १, कुंभारवाडा १, दर्गा रोड, श्रीकृष्णनगर १, नगिनानगर १, देवानगरी १, पहाडसिंगपुरा १, आकाशवाणी परिसर १, हर्सूल सावंगी १, एन दोन सिडको ३, ऑडिटर हौ.सो. हर्सूल १, बजरंग चौक, एन सात सिडको १, विजयनगर, गारखेडा १, राज हाईटस् १, पोलीस कॉलनी १, नंदिनी हॉटेलच्या मागे, बीड बायपास १, एन नऊ सिडको १, अन्य ९५.

ग्रामीण भागातील रुग्ण

जि.प. शाळा वाकोद १, दादेगाव, तरणगाव १, अन्य १५.

Web Title: In the district again,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.