जिल्हा बँक : शेतकरी विकास पॅनल ‘कपबशी’वर तर शेतकरी सहकार बँक विकास पॅनल ‘छत्री’वर लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:02 AM2021-03-15T04:02:16+5:302021-03-15T04:02:16+5:30
शेतकरी विकास पॅनलचे मतदारसंघनिहाय उमेदवार असे : शेतकी मतदार संघ : औरंगाबाद - जावेद पटेल, फुलंब्री - सुहास शिरसाठ, ...
शेतकरी विकास पॅनलचे मतदारसंघनिहाय उमेदवार असे : शेतकी मतदार संघ : औरंगाबाद - जावेद पटेल, फुलंब्री - सुहास शिरसाठ, सिल्लोड- अर्जुन गाढे, सोयगाव-सुरेखा काळे, कन्नड -मनोज राठोड, गंगापूर -शेषराव जाधव,वैजापूर आप्पासाहेब रामकृष्ण पाटील. या मतदारसंघातून पैठणहून रोहयो मंत्री संदिपान भुमरे हे बिनविरोध निवडून आले तर खुलताबादहून किरण पाटील डोणगावकर हे बिनविरोध निवडून आले.
बिगर शेतकी मतदार संघातील उमेदवार : हरिभाऊ बागडे, सतीश चव्हाण, अंबादास दानवे, नितीन पाटील व अभिजित देशमुख.
कृषी पणन व शेतमाल प्रक्रिया मतदारसंघातून राज्यमंत्री अब्दुल सत्तार. महिला राखीव मतदारसंघातून मंदा माने व मंगल वाहेगावकर. एसीएसटी मतदारसंघातून डॉ. सतीश गायकवाड. ओबीसी - अंकुश रंधे व व्हीजेएनटी - दिनेश परदेशी.
शेतकरी सहकार बँक विकास पॅनलचे मतदार संघवार उमेदवार असे: शेतकी मतदार संघ: औरंगाबाद - अंकुश शेळके,फुलंब्री- पुंडलिक जंगले, सिल्लोड- विष्णू जांभूळकर, सोयगाव-रंगनाथ काळे, कन्नड -अशोक मगर, गंगापूर -कृष्णा पाटील डोणगावकर, वैजापूर -ज्ञानेश्वर जगताप. जयराम साळुंके (गंगापूर- छताचा पंखा) दत्तात्रय धुमाळ (वैजापूर-विमान)
बिगर शेती मतदारसंघातून जगन्नाथ काळे, रवींद्र काळे, रंगनाथ कोलते, एकनाथ जाधव, दिलीप बनकर तर अभिषेक जैस्वाल (मेणबत्ती),अनिल मानकापे (छताचा पंखा) कैलास पाथ्रीकर (पतंग) शहानवाज खान (विमान)
कृषी पणन व शेतमाल प्रक्रिया मतदार संघातून प्रकाश मुथा तर विमान चिन्हावर शहानवाजखान , महिला राखीव मतदारसंघात पार्वता जाधव व सुरेखा बोडके तर मनीषा डोळस (मेणबत्ती )मनीषा निकम (पतंग) कविता बोडके (छताचा पंखा) शहीदाबेगम शाहनवाज खान (विमान) एसीएसटी मतदारसंघ: डॉ. पवन डोंगरे (छत्री) व प्रकाश वाघमारे (विमान)तर ओबीसी-देवयानी डोणगावकर (छत्री) व व्हीजेएनटी- शाहनवाज खान( छत्री)