जिल्हा बँक : संदीपान भुमरे व किरण पाटील डोणगावकर बिनविरोध, आणखी १४ उमेदवार बाद, आता रिंगणात ४८ उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:02 AM2021-03-14T04:02:16+5:302021-03-14T04:02:16+5:30

छाननीत बाद ठरलेले उमेदवार असे : वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, पैठणचे माजी आमदार संजय ...

District Bank: Sandipan Bhumare and Kiran Patil Dongaonkar unopposed, 14 more candidates dropped, now 48 candidates in the fray | जिल्हा बँक : संदीपान भुमरे व किरण पाटील डोणगावकर बिनविरोध, आणखी १४ उमेदवार बाद, आता रिंगणात ४८ उमेदवार

जिल्हा बँक : संदीपान भुमरे व किरण पाटील डोणगावकर बिनविरोध, आणखी १४ उमेदवार बाद, आता रिंगणात ४८ उमेदवार

googlenewsNext

छाननीत बाद ठरलेले उमेदवार असे : वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे, सुनीता विलास चव्हाण (खुलताबाद), किशोर बलांडे (फुलंब्री), जे. के. जाधव, अनिल बोरसे, नंदकुमार गांधीले, राहुल सावंत, प्रदीप शिंदे, पद्माबाई म्हस्के, राजू पोळ, सुनीता सोलाटे, देवीदास मनगटे.

आता १८ जागांसाठी ४८ उमेदवार रिंगणात असून त्यांना रविवारी (दि.१४) चिन्हांचे वाटप करण्यात येईल, असे निर्वाचन अधिकारी मुकेश बारहाते यांनी सांगितले.

२१ मार्च रोजी मतदान होऊन २२ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. वस्तुत: आतापर्यंत एकूण २१ जागा असायच्या. यावेळी वैयक्तिक मतदारसंघ बाद झाला. कारण बँकेच्या संस्थापक सदस्यांपैकी कुणीही हयात नाही.

पणन प्रक्रिया मतदारसंघातून राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे बिनविरोध निवडून येण्याची चर्चा असतानाच आता ही निवडणूक चुरशीची होईल. प्रकाश मुथा आणि शहानवाज खान यांच्याशी सत्तार यांचा मुकाबला आहे.

Web Title: District Bank: Sandipan Bhumare and Kiran Patil Dongaonkar unopposed, 14 more candidates dropped, now 48 candidates in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.