जिल्हा बँक घोटाळ्याचा मंगळवारी फैसला
By Admin | Published: February 5, 2017 11:21 PM2017-02-05T23:21:10+5:302017-02-05T23:25:47+5:30
बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे नियमबाह्य कर्ज वाटप प्रकरणात दाखल गुन्ह्यांपैकी घाटनांदूर (ता. अंबाजोगाई) येथील पहिल्या प्रकरणाची सुनावणी झाली असून, मंगळवारी निकाल जाहीर होणार आहे.
बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे नियमबाह्य कर्ज वाटप प्रकरणात दाखल गुन्ह्यांपैकी घाटनांदूर (ता. अंबाजोगाई) येथील पहिल्या प्रकरणाची सुनावणी झाली असून, मंगळवारी निकाल जाहीर होणार आहे.
घाटनांदूर येथील शेतकरी सहकारी तेलबिया प्रक्रिया संस्थेला दोन कोटी ९० लाख रूपयांचे कर्ज दिले होते. अंबाजोगाई येथील न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. तत्कालीन अध्यक्ष राजाभाऊ मुंडे, तत्कालीन सरव्यवस्थापक शरद घायाळ यांच्यासह इतर ८ संचालक व अधिकारी यांचा आरोपींत समावेश आहे.
या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून, मंगळवारी न्यायालय अंतिम फैसला सुनावणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)