जिल्हा बँक : छाननी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:04 AM2021-02-24T04:04:12+5:302021-02-24T04:04:12+5:30
व्हीजेएनटी व महिला राखीव मतदार संघातील विविध कारणांमुळे प्रत्येकी आठ आणि नऊ अर्ज बाद ठरले. नितीन पाटील, कृष्णा पाटील ...
व्हीजेएनटी व महिला राखीव मतदार संघातील विविध कारणांमुळे प्रत्येकी आठ आणि नऊ अर्ज बाद ठरले.
नितीन पाटील, कृष्णा पाटील डोणगावकर, रंगनाथ काळे, नंदकुमार गांधिले व संतोष जाधव यांच्या अर्जांवरील आक्षेपांवर रात्री उशिरापर्यंत सुनावणी सुरू होती. नितीन पाटील यांच्या अर्जावर दाखल करण्यात आलेल्या आक्षेपांतर्गत दीड-दोनशे कागदपत्रे जोडण्यात आलेली आहेत.
बँकेच्या या निवडणुकीत वेगवेगळ्या मतदारसंघांसाठी २१४ अर्ज आले होते.
व्हीजेएनटी मतदार संघात दोन हजार रुपये अनामत रक्कम भरणे गरजेचे असताना एक नव्हे दोन नव्हे तर नऊ उमेदवारांनी पाचशे रुपये अनामत भरली; त्यामुळे त्यांचे अर्ज बाद ठरले. यात बँकेचे विद्यमान संचालक बाबूराव पवार यांचाही समावेश आहे.
अनामत रक्कम किती भरावयाची आमच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे होते. त्यांनी तसे न करता अर्ज स्वीकारले. त्यामुळे अर्ज बाद होण्यास केस जबाबदार असून याविरुद्ध अपील करण्यात येईल, असे बाबूराव पवार यांनी सांगितले.
महिला मतदार संघातील वर्षा जगन्नाथ काळे यांचा अर्ज बाद ठरला. त्या विद्यमान संचालक होत्या. मागासवर्गीय राखीव मतदारसंघातून भाजपचे राजू शिंदे यांचा अर्ज बाद ठरला. व्हीजेएनटी मतदारसंघात राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड यांचा अर्ज वैध ठरला. मागासवर्गीय राखीव मतदारसंघात एकूण दहा अर्ज आले होते. त्यांपैकी चार अर्ज बाद ठरले.